शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

परस्पर नव्या नियुक्त्या केल्याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 19:32 IST

२४ जून रोजी औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांची, तर हिशाम उस्मानी यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.

ठळक मुद्देजाहीर नव्हे, पण दबक्या आवाजात तक्रारी सुरूकार्यकारिणी जम्बो राहील; पण बनवायला वेळ लागेल

- स.सो. खंडाळकर औरंगाबाद : अलीकडेच झालेल्या काँग्रेसच्या जिल्हा व शहराध्यक्षांच्या नियुक्त्यांच्या वेळी आम्हाला अजिबात विश्वासात घेतले गेले नाही. परस्परच या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या, असा नाराजीचा सूर माजी जिल्हाध्यक्ष व माजी शहराध्यक्ष जाहीरपणे नाही; पण दबक्या आवाजात काढत आहेत. नव्या नियुक्त्या झाल्यानंतरच आम्हाला कळले, असे त्यांचे म्हणणे आहे.

२४ जून रोजी औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांची, तर हिशाम उस्मानी यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. कोरोनाचे संकट चालू असताना असे काही बदल होतील, असे वाटत नसताना हे बदल घडवून आणण्याचे धाडस प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी अनिल पटेल यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा प्रभार सोपवला. ते केव्हा तरी बदलले जाणारच होते; परंतु हा बदल करताना साधे विचारलेसुद्धा नाही, अशी खंत मात्र पटेल यांना बोचत आहे. नामदेव पवार यांचीही अशीच खंत आहे. पक्षातील एक गट पवार यांच्यावर नाराज होता. तो बदल मागत होता; परंतु हा बदल करीत असताना पवार यांचे प्रदेश काँग्रेसमध्ये पुनर्वसन केले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती; पण तसेही झाले नसल्याने पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे.

कार्यकारिणी जम्बो राहील; पण बनवायला वेळ लागेलकाँग्रेसची शहर कार्यकारिणी जम्बो राहील. त्यात सर्व समाजघटकांना सामावून घेण्यात येईल; परंतु कोरोनामुळे या कामाला विलंब लागू शकतो, असे उस्मानी यांनी स्पष्ट केले. सध्या उस्मानी हे विविध समाजघटकांमधील कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचे काम करीत आहेत. त्यात काही सेवानिवृत्त अधिकारीही आहेत. आतापर्यंत सुमारे शंभर नव्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले. 

गांधी भवनाचे नूतनीकरण नूतन शहराध्यक्ष हिशाम उस्मानी हे कामाला लागले आहेत. शाहगंज येथील पक्ष कार्यालय असलेल्या गांधी भवनाचे नूतनीकरण त्यांनी हाती घेतले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेले हे काम आणखी महिना, दोन महिने चालेल. या कामावर सुमारे दहा लाख रुपये खर्च होणार असल्याचे उस्मानी यांनी सांगितले. गांधी भवनाचे छत सतत पडत असते. पावसाळ्यात गळत असते. ही सारी कामे सुरू करण्यात आली आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबाद