शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अक्षम्य दुर्लक्ष ! कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा आरोग्य यंत्रणेला पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 14:05 IST

No contact tracing in Aurangabad : एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान २० जणांची तपासणी करावी, असे निकष ठरविण्यात आले.

ठळक मुद्देकोरोना आजारामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा नवीन प्रकार नागरिकांना कळाला. वर्षभरापूर्वी बाधित रुग्णांच्या घराजवळ महापालिकेकडून निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. बाधितांच्या कुटुंबातील कोणाचीही तपासणी नाही

औरंगाबाद : वर्षभरापूर्वी बाधित आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील नातेवाइकांना, शेजारी, वसाहतीमधील नागरिकांना नेऊन कोरोनाची तपासणी करण्यात येत होती. आता तर एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांची सुद्धा महापालिकेकडून तपासणी होत नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा प्रकार पूर्वीही होता आणि आजही कायम आहे. मात्र, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे या प्रकाराकडे गंभीर दुर्लक्ष होत आहे. कोरोना संसर्ग वाढण्यास यामुळे मदत होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वर्षभरापूर्वी बाधित रुग्णांच्या घराजवळ महापालिकेकडून निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. कोरोना आजारामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा नवीन प्रकार नागरिकांना कळाला. एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान २० जणांची तपासणी करावी, असे निकष ठरविण्यात आले. हे निकष आजही जशास तसे आहेत. मात्र, औरंगाबाद महापालिकेला याचा विसर पडला आहे. मागील काही दिवसांपासून महापालिकेने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा प्रकार जवळपास बंदच करून टाकला आहे. रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य घाबरून स्वतःहून तपासणी करून घेत आहेत. अनेकजण तपासणीच करीत नाहीत. बाधित आलेल्या प्रत्येक रुग्णाचा नंबर, पत्ता महापालिकेकडे असतो. मात्र, त्यांना तपासणीसाठी महापालिकेकडून सांगण्यात येत नाही. कुटुंबातील इतर सदस्य कोरोनाबाधित असू शकतात. त्यांना शोधून काढण्याचे काम महापालिकेकडून होत नाही.

मनपाकडून विचारणाही नाहीसिडको एन-८ भागातील ३८ वर्षीय तरुण बाधित आला. त्याच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य नंतर बाधित आला. दोन्ही रुग्णांची संपूर्ण माहिती महापालिकेकडे होती. मात्र, मागील आठ दिवसांमध्ये महापालिकेने संबंधित रुग्णांना विचारलासुद्धा केलेली नाही. कुटुंबातील इतर सदस्यांची तपासणी झाली किंवा नाही हेसुद्धा विचारले नाही.

५ जणांचीही तपासणी नाहीएका बाधित रुग्णाच्या कुटुंबातील किमान पाच सदस्यांची तरी महापालिकेने दररोज तपासणी केली तर १५०० रुग्णांच्या संपर्कातील ७५०० जणांची तपासणी करावी लागेल. संपूर्ण शहरात दररोज तीन ते चार हजार जणांची तपासणी होत आहे. या सर्व तपासण्या नागरिक रांगा लावून करीत आहेत, हे विशेष.

रुग्णवाढीमुळे थोडेसे दुर्लक्षएका बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान तीन जणांची तरी तपासणी करण्याकडे महापालिकेचा कल आहे. तपासणीसाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. दररोज दहा हजार नागरिकांच्या तपासणीचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आणि आसपासच्या नागरिकांची तपासणी करण्यात येईल.- डॉ. बाळकृष्ण राठोडकर, प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद