लातूर : शेतकरीविरोधी कायदे रद्द करा तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी किसान पुत्रांनी रविवारी शहरातील गांधी चौकात लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणात सुपर्ण जगताप, प्रा. बापूदेव माचवे, अजय गुरधाळकर, अॅड. अनुप पात्रे, श्रीनिवास बडुरे, किरण पवार, यशवंत चव्हाण, अमोल झेंडे, देवानंद शिंदे, अक्षय काळे, तौफिक रोजेवाले, तन्मय रोडगे, अखिलेश आयनाले, दीपक हेंबाडे, समीर शेख, नामदेव डोकळे, ज्ञानेश्वर भिसे, श्रीकृष्ण काळे, धनंजय राऊत, नितीन साळुंके आदी सहभागी झाले होते. १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ येथील साहेबराव करपे कुटुंबियांनी कर्जाला कंटाळून सहकुटुंब आत्महत्या करून सरकारपुढे प्रश्न निर्माण केला होता. आजचा शेतकरीही त्याच परिस्थितीतून जात आहे. खचलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे आणि सात-बारा कोरा करावा, अशा मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, उपोषणकर्त्यांना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील, माधव बावगे, अतुल देऊळगावकर, विठ्ठल मोरे, अॅड. उदय गवारे, अॅड. सुपोष आर्य, डॉ. पवन लड्डा, दत्तोपंत सूर्यवंशी, दिनकर मुगळे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. (प्रतिनिधी)
किसान पुत्रांचा अन्नदात्यासाठी अन्नत्याग
By admin | Updated: March 19, 2017 23:26 IST