शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

फूल तो अब भी खिलते हैं; खुशबू तेरे साथ गयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:26 IST

औरंगाबादचे भूषण, शायर बशर नवाज यांचा आज चौथा स्मृतिदिन. यानिमित्त बशरसाहेबांचे चाहते डॉ. संदीप शिसोदे यांनी त्यांच्या जागविलेल्या आठवणी.

‘‘सिर्फ हम ही नहीं हर एक ने जीने के लिएचंद ख्वाबों के खिलौनों से बहलना चाहा’’

हो हो यापलीकडे काय आहे, ते म्हणजे शब्दांची पकड. त्याची खोली. त्या शब्दांची ताकद आणि ती जाणून तिला चपखल जागी बसवण्याची कसब. ही फक्त बशर नवाज साहेब सारख्या जोहरीकडेच असू शकते. याचा प्रत्यय त्यांच्या गजलमध्ये येतो. वारंवार वाचताना येणारा नवनवीन अनुभव जबरदस्त असतो. आज त्यांची चौथी  पुण्यतिथी. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण, आठवणी ताज्या झाल्या. त्यांच्यासोबतचाक्षण म्हणजे एक नवा अनुभव समृद्ध करणारा. ऊर्जा देणारा मानसिक ताकद देणारा सामर्थ्याचा अनुभव. 

‘‘धूप पी पी के झुलस जाये जमी... तब बरसे हैं घटाओं के भी अंदाज निराले कितने’’

बशर साहेबांचे राहणीमान अगदी साधे-सरळ; पण त्यांच्या गजलेत बेभान होऊन निघालेले शब्द म्हणजे एक दिव्य अनुभव. वरचे शब्द द्या धूप पी पी के झुलस जमीन बापरे काय आहे हे वर आग ओकणारा सूर्य आणि एकेक थेंबासाठी तहानलेली जमीन किती सत्वपरीक्षा आहे. यानंतर भावविभोर होऊन उठलेले आभाळ, बरसणारे आभाळ, कोसळणारं आभाळ किती छोटं किती रंग. प्रत्येक शब्द एक नवा शब्दकोश तयार होईल, असा बाबा म्हणायचे. त्यांना, सगळे बाबा बाबा म्हणजे वडील-वडील समान म्हणजे बाप गजलेचा या अर्थाने...त्या नजाकततेचा शब्द सौंदर्याचा खजाना म्हणजे बाबा एका गजलेत ते म्हणतात,‘‘नजरें ठहर-ठहर गई रंगे लिबास देखकर किसको पता चला मगर अपने ही खून में तर थे हम’’ 

खरंच आहे ना आपण स्वत:मध्ये इतके गर्क असतो, गुंतलेलो असतो की, आपल्याला इतर कोणाची काही चिंता, काळजी नसते; पण हे मांडता येणे हीच खुबी होती बाबांच्या शब्दांची. वास्तवाची जाणीव, वास्तवाचं भान आणि सगळ्या परिस्थितींवर असलेलं त्यांचं सडेतोड जबाब म्हणजेच बाबा गजल वाचून समजायला लागली आणि बाबा आपल्यातून ते त्यांच्या दुनियेत गेले आणि आपल्या सर्वांना सोडून गेले. त्यांच्या आठवणी आपल्यापाशी सोडून गेले. त्यांच्या गजल नजम शेर रूपात त्यांच्या शब्दांमधून ते-‘‘वो रुत बीती बात गयीसपनों जैसी रात गयी,अश्कों का तो कुछ न गयाआबरू-ए-जज्बात गयी,अब के भी हम मिल न सकेअब के भी बरसात गयी,फूल तो अब भी खिलते हैंखुशबू तेरे साथ गयी’’ 

बशर नवाज साहेब यांच्याकडं अधून-मधून जाणं व्हायचं. पहिल्यांदा त्यांच्यावरच्या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. उर्दू शेर गजल यापासून कोसोदूर असलेल्या मी पण त्या रात्री बशर साहेबांनी त्यांच्या तोंडून  आवडीचा शेर काढला आणि तो असा...‘‘नींद रुठे हुए लोगों को मनाना ही है,आंख खोलूंगा तो वो फिर से बिछड जायेंगे’’हा शेर मनाला भिडला आणि उर्दू गजल शेरच्या प्रेमात पडलो. बाबांची शेर गजल आणि नजर या वास्तव आयुष्य, प्रेम वास्तव आणि स्वप्न यावर आधारित आहेत. त्यांची इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू ,अरबी या भाषांवर  कमांड होती.

- डॉ. संदीप शिसोदे

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcinemaसिनेमाliteratureसाहित्य