शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

फुले,फळे अन् भाज्याही महागल्या

By admin | Updated: September 4, 2014 00:20 IST

यशवंत परांडकर, नांदेड नांदेड : पूर्वा नक्षत्र प्रारंभ झाल्यापासून पाऊस सुरू आहे़ त्यामुळे अनेकांनी गौरी आवाहनाला म्हणजे मंगळवारीच बाजार उरकून घेतला.

यशवंत परांडकर, नांदेडनांदेड : पूर्वा नक्षत्र प्रारंभ झाल्यापासून पाऊस सुरू आहे़ त्यामुळे अनेकांनी गौरी आवाहनाला म्हणजे मंगळवारीच बाजार उरकून घेतला. गौरी पूजनाच्या दिवशी अनासायास बुधवारचा बाजार असल्याने आणि पावसाने उघडीप दिल्याने बाजारपेठेत गर्दी दिसत होती़आदिमाता, आदिशक्ती महालक्ष्मी पूजेच्या साहित्यांपासून सजावट तसेच भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची बाजारात झुंबड उडाली होती़ मंगळवारी रात्री महालक्ष्मीची विधिवत प्रतिष्ठापणा करण्यात आली़ त्यात केळीची पाने, नागेलीची पाने, कमळ, मक्याचे कणीस, काकडी, भेंडी, भोपळा, बीट, चवळीच्या शेंगा, गवार, वालच्या शेंगा, गवार शेंगा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, शेवगा, भोपळा, कद्दू, फूलकोबी, पानकोबी, वांगी, कडीपत्ता, पुदिना, लिंबू, मिरची, तोंडले, कार्ले, सफरचंद, मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले होते. यंदा भाजीपाल्याचे दर थोड्याफार प्रमाणात कडाडल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत होती. पण पूजेसाठी आवश्यक असल्यामुळे प्रत्येक जण उत्साहाने खरेदी करीत असल्याचे चित्र होते. सजावटीच्या साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हारांनी लक्ष वेधून घेतले होते. साधारणत: ३० ते ३५ रुपये डझनप्रमाणे केळी विक्री झाल्याचे श्रीनगर भागातील केळी विक्रेते संग्राम कांबळे यांनी सांगितले. पूजेच्या साहित्यामध्ये, नागेलीची पाने, सुपारी, नारळ, हळद, कुंकू, बताशे, बदाम, खरीक, हाळकूंड,फुलवाती, निरंजन, महालक्ष्मीचे वस्त्र आदींची खरेदी करण्यासाठी नागरिकांची वर्दळ दिसून आली. पूजेसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या फुलांना मोठी मागणी दिसून आली. साधारणत: दीडशे ते पाच हजार रुपयांपर्यंतचे हार विक्रीसाठी उपलब्ध होते. फुलांमध्ये शेवंती ३०० रुपये किलो, , पिवळा झेंडू १०० रुपये, गुलाब २०० रुपये किलो असल्याची माहिती फूलविक्रेते अब्दुल अलीम खान यांनी दिली.