शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

गंगापूर, वैजापुरातील गावांत पुराचे पाणी; शेकडो एकर शेती पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 19:31 IST

एनडीआरएफच्या जवानांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले 

ठळक मुद्देपिकांचे अतोनात नुकसानघरांतील साहित्य गेले वाहून 

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यात गोदावरी नदीत सोमवारी पहाटे ५ वाजता २ लाख ७६ हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. त्यामुळे गोदावरी नदीने पात्र सोडत गोदाकाठी असलेल्या बाबतारा, भालगाव, डोंणगाव अणि लाखगंगा येथील अनेक घरांत पाणी शिरले. यामुळे काही घरांतील साहित्य वाहून गेले. एनडीआरएफच्या जवानांनी ठिकठिकाणी सकाळपासून बचावकार्य करीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. 

रविवारी रात्री सलग तिसऱ्या दिवशी गोदावरी नदीला आलेल्या महापुराने दाणादाण उडवून दिली. बहुतांश गावांतील जनजीवन विस्कळीत झाले. नदीतून होणारा तुफानी विसर्ग जवळपास नदीकाठावरील सर्वच गावे अणि वाड्या-वस्त्यांना विळखा घातला. त्यामुळे सोमवारी महापुराचा इशारा देण्यात आल्याने या परिसरातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. गोदाकाठावरील काही वस्त्यांमधील लोक पुरात अडकले होते. त्यापैकी १२ जणांना सोमवारी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. वैजापूर, वीरगाव पोलिसांसह एनडीआरएफच्या जवानांची तुकडी ठिकठिकाणी सकाळपासून बचावकार्य करीत आहे. सोमवारी पहाटे पाण्याचा विसर्ग एवढा वेगात होता की, नदीकाठावरील अनेक घरांपुढील साहित्य, पत्रे, पाण्याच्या टाक्या, झाडे, विद्युत पोलदेखील  गोदावरीच्या पात्राने कवेत घेतले होते. हे साहित्य वाहत जाऊन पुढे ठिकठिकाणी नदीकाठच्या कठड्यांना अडकल्याने लाटांचा तडाखा आणि धडकी भरवणारा आवाज येत होता. 

गंगापूर तालुक्यात शेकडो एकर शेती पाण्यातगंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीला आलेल्या पुरात नदीकाठावरील शेकडो एकर शेतीमधील पिके पाण्याखाली गेली असून, रस्त्यावर पाणी आल्याने ममदापूरचा नेवरगावपासून संपर्क तुटला आहे.  पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत.नाशिक जिल्ह्यात सर्वच धरणांतील पाण्याचा विसर्ग जायकवाडी प्रकल्पात सोडण्यात येत आहे. या पाण्याच्या रेट्याने गोदावरी नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे सोमवारी नेवरगाव येथील संकटेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. आगरकानडगाव, नेवरगाव, जामगाव, हैबतपूर, कायगाव, अंमळनेर, लखमापूर, आगरवाडगाव, भिवधानोरा, गळनिंब शिवारातील जायकवाडी संपादित क्षेत्रात पाणी शिरले आहे. या पाण्यामुळे येथील कापूस, मका, ऊस, मूग, सोयाबीन आदी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जुने नेवरगाव ते ममदापूर रस्ता बंद झाल्याने म्हसोबावाडी येथील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. मात्र, त्यांना रस्त्याऐवजी कानडगावकडे जाण्यासाठी कच्च्या रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार अरुण जºहाड यांनी ७ पथके तयार के ली असून, त्यात नायब तहसीलदार नामदेव देशटवाड, अभय बेलसरे, बी. डी. तेजीनकर, सदाशिव पंदुरे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :floodपूरAurangabadऔरंगाबादgodavariगोदावरी