शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत चार्टर विमानांची भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 23:28 IST

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारानिमित्त शहरात प्रमुख पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारसंघांत पोहोचण्यासाठी बहुतांश नेत्यांनी चार्टर विमानांतून प्रवासाला प्राधान्य दिले. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत २२ वर चार्टर विमानांचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग आणि टेकआॅफ झाले.

ठळक मुद्देचिकलठाणा विमानतळ : प्रचारासाठी नेत्यांची वर्दळ, दहा दिवसांत २२ वर चार्टर विमाने

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारानिमित्त शहरात प्रमुख पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारसंघांत पोहोचण्यासाठी बहुतांश नेत्यांनी चार्टर विमानांतून प्रवासाला प्राधान्य दिले. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत २२ वर चार्टर विमानांचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग आणि टेकआॅफ झाले.शहरात लोकसभा निवडणुकीनिमित्त आयोजित केलेल्या सभांसाठी गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाक रे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, आ. राजाभय्या, बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रक ाश आंबेडक र, एमआयएम पक्षप्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी, पंजाब सरक ारमधील क ाँग्रेसचे मंत्री तथा माजी क्रि के टपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह प्रमुख पक्षांचे वरिष्ठ नेते आले होते.पक्षांतील वरिष्ठ नेत्यांना पाचारण करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून प्राधान्य दिले जाते. प्रत्येक उमेदवार पक्षासाठी महत्त्वाचा असल्याने नेतेमंडळींनी प्रचारासाठी आयोजित सभांसाठी आवर्जून हजेरी लावण्यावर भर दिला. वेळ वाचविण्यासाठी हवाई साधन अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे एकाच दिवसांत कमीत कमी वेळ अनेक ठिकाणी हजर राहण्यासाठी चार्टर विमानांचा वापर करण्यावर भर देण्यात आला. औरंगाबादेत आलेले अनेक नेते चार्टर विमानाने शहरात दाखल झाले. त्यामुळे गेल्या काही दिवसांत विमानतळ चार्टर विमानांच्या उड्डाणांनी गजबजून गेले होते. जालना येथे सभेसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेदेखील विमानाने दाखल झाले होते. मागील दहा दिवसांत २२ पेक्षा अधिक चार्टर विमानांची ये-जा झाल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.खर्च वाचविण्यासाठी शक्कलनिवडणुकीत हवाई खर्च दाखविला जात नाही, अशी ओरड होते. त्यामुळे चार्टर विमानांच्या उड्डाणांवर नजर ठेवली जात आहे. क ोणत्या पक्षाचे नेते कुठून आले, कसे आले, यासंबंधीची खातरजमा निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. यावर शक्कल एकाच विमानातून दोघांचा प्रवास, उद्योजक मंडळींच्या विमानातून प्रवास करण्यास पसंती दिली गेल्याचे समजते. शहरात एखादा नेता प्रचारासाठी चार्टर विमानाने आला तर त्यासंबंधीचा खर्च नेत्यांकडे की उमेदवारांकडे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळElectionनिवडणूक