शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

पाच वर्षांनी आली भाजपाला जाग

By admin | Updated: December 21, 2014 00:18 IST

औरंगाबाद : महापालिकेत शिवसेनेबरोबर सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना सुमारे पावणेपाच वर्षांनंतर आज पहिल्यांदा जाग आली.

औरंगाबाद : महापालिकेत शिवसेनेबरोबर सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना सुमारे पावणेपाच वर्षांनंतर आज पहिल्यांदा जाग आली. सत्तेच्या विरोधात भाजपा नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत ठिय्या दिला. समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदार कंपनीकडून देण्यात येणारी बोगस बिले, रस्त्यांची व वॉर्डातील रखडलेल्या विकासकामांवरून भाजपा नगरसेवकांनी एक तास सभागृहात बैठे आंदोलन केले. शिवसेनेला आगामी काळात शह देण्याच्या दृष्टीने ही रणनीती आखण्यात आली होती. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी आणि प्रशासनाच्या विरोधात भाजपा नगरसेवकांनी घोषणा दिल्या. यावरून सेना-भाजपा नगरसेवकांत शाब्दिक वाद झाले. सभेच्या सुरुवातीलाच गटनेते संजय केणेकर, महेश माळवतकर, संजय चौधरी, बबन नरवडे, बालाजी मुंडे, साधना सुरडकर, ऊर्मिला चित्ते, कमल नरोटे, हुशारसिंग चौहान, राजू शिंदे यांनी पाणीपट्टीची बिले आणि रस्त्यांच्या कामांवरून महापौरांसमोरील राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. उपमहापौर संजय जोशी डायसवरून खाली उतरले. त्यांनी नगरसेवकांना समजावले. त्यानंतर राजू वैद्य, गजानन बारवाल यांनीही समजावले; परंतु कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. भाजपाच्या ठिय्या आंदोलनात अफसर खान, मिलिंद दाभाडे यांनीही उडी घेतली. महापौर कला ओझा यांनी वैतागून सभा तहकूब केली.