शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

पाच वर्षांत वाढला दुपटीने निकाल !

By admin | Updated: June 3, 2014 00:45 IST

भालचंद्र येडवे , लातूर विभागीय मंडळाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे गत पाच वर्षात या विभागाचा निकाल दुपटीने वाढल्याचे चित्र निकालाअंती स्पष्ट झाले़

 भालचंद्र येडवे , लातूर एकेकाळी या ना त्या कारणाने संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या लातूर विभागीय मंडळाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे शिवाय विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी घेतलेल्या परीक्षेच्या गांभीर्यामुळेच गत पाच वर्षात या विभागाचा निकाल दुपटीने वाढल्याचे चित्र सोमवारी निकालाअंती स्पष्ट झाले़ लातूर विभागीय मंडळांतर्गत असलेल्या नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्याच्या गत पाच वर्षाच्या निकालावर नजर मारली असता मार्च २०१० मध्ये ४७़५९ टक्क्यांवरून मार्च २०१४ मध्ये ९०़६० वर हा निकाल जाऊन पोहोचला आहे़ दरवर्षी लातूर विभागाच्या निकालाचा आलेख वाढतच आहे़ २०१० मध्ये ४७़५९, २०११ - ५६़५७, २०१२ - ७५़४६, २०१३ - ८३़५४ तर २०१४ मध्ये ९०़६० टक्यांवर जावून पोहोचला आहे़ चार ते पाच वर्षांपूर्वी मास कॉपी व शेकडोंवर गैरप्रकार होत असलेल्या या विभागात आता गैरप्रकाराची आकडेवारीही नगण्य होत चालली आहे़ यंदा मार्च २०१४ मध्ये केवळ २२ विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले़ त्यात लातूर ८, नांदेड ४ तर उस्मानाबाद १० अशी संख्या आहे़ याची टक्केवारी पाहिली असता ०़०३ अशी आहे़ या निकालाचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे विभागात एकही शाळा शून्य टक्के निकाल असलेली उपलब्ध नाही, असा दावाही मंडळाने केला. (कौतुक गुणवंतांचे हॅलो ३ वर) सकारात्मक बदल... परीक्षेतील प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मंडळाने यंदा राज्यात पहिल्यांदाच एक उपक्रम हाती घेतला आहे़ लातूर विभागीय मंडळातील अधिकारी- कर्मचार्‍यांची विशेष पथके नेमून प्रत्येक केंद्रावर या पथकांना परीक्षा संपेपर्यंत थांबण्याबाबत सूचना दिल्या होत्या़ शिवाय, अचानकपणे परीक्षा संपल्याबरोबर कोणत्याही एका केंद्रावरील संपूर्ण उत्तर पत्रिका आपल्या ताब्यात घेत हे पथक थेट मंडळ गाठले़ मंडळ अचानकपणे राबवित असलेल्या या उपक्रमामुळे परीक्षेशी संबंधित घटकांच्या विशिष्ट वैचारिक मनोवृत्तीमध्ये सकारात्मक बदल व गैरप्रकार कमी होण्यास मदत झाल्याचा दावाही मंडळ करीत आहे़ वाणिज्य शाखेचा सर्वाधिक निकाल लागला असून, ९२़९० टक्के या शाखेची टक्केवारी आहे़ त्यापाठोपाठ विज्ञान शाखेचा क्रमांक लागतो़ लातूर विभागात विज्ञान शाखेचा ९२़३७, कला ८८़५७, वाणिज्य ८२़९०, एचएससी व्होकेशनल ८८़३९ असा निकाल लागला आहे़ चित्रिकरण केलेल्या परीक्षा केंद्रांची चौकशी बारावी परीक्षेदरम्यान, संपूर्ण राज्यभरात ३१७ परीक्षा केंद्रांचे चित्रिकरण करण्यात आले होते. पैकी लातूर विभागातील १८९ केंद्रांपैकी काही उपद्रवी केंद्रांसह एकूण ५१ केंद्रांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. कोणत्याही क्षणी या केंद्रांची चौकशी होईल, असे मंडळाच्या सूत्रांकडून समजते. लातूर जिल्ह्यात २४३ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ७६ केंद्रांवर परीक्षा झाली. २८ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार ८५५ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यातील २६ हजार ४३९ विद्यार्थी यशस्वी झाले असून, लातूर जिल्ह्याचा ९१.६३ टक्के निकाल लागला आहे. मुलींचा टक्का वाढताच ! बारावीच्या परीक्षेत विभागामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही निकालात मुलींचा टक्का वाढता आहे. विभागात परीक्षेस बसलेल्या मुलां-मुलींपैकी मुलांची टक्केवारी ८८.४५ तर मुलींची ९३.७९ टक्के आहे. याही परीक्षेत ६ टक्क्यांनी मुली पुढे आहेत.