मन्नास पिंपरी : सेनगाव तालुक्यातील माझोड येथे अस्वच्छतेमुळे पाच वर्षीय मुलास काविळाची लागण होवून उपचारादरम्यान वाशिम येथे त्याचा मृत्यू झाला आहे. गावातील अस्वच्छतेने कळस गाठल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली आहे.माझोड येथील शेख फैजान शेख मुख्तार (वय ५) यास गावातील अस्वच्छ पाण्यामुळे काविळाची लागण झाली होती. वाशिम येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान गावात सर्वत्र अस्वच्छता पसरलेली असून तीन वर्षापासून ग्रामपंचायतीने साफसफाई मोहिम राबविली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. नाल्या तुंडूब भरल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. परिणामी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून या बाबत प्रशासनाला निवेदन देवूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ग्रामपंचायतीचेही याकडे दुर्लक्ष झालेले आहे.या बाबीची गंभीर दखल घेवून प्रशासनाने गावात स्वच्छता मोहिम राबवावी, अशी मागणी ग्रा.पं. सदस्या कांताबाई पडघाण, प्रल्हाद पडघाण, डॉ. विष्णू मुळे, पारीसकर, कुंडलिक पडघाण आदींनी केली आहे. (वार्ताहर)
पाच वर्षीय मुलाचा काविळाने मृत्यू
By admin | Updated: August 15, 2014 00:04 IST