शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच वाहने एकमेकांवर आदळली

By admin | Updated: November 18, 2015 00:37 IST

पारगाव : मालवाहतूक ट्रकने अचानक ब्रेक मारले आणि एकामागून एक पाच वाहने एकमेकांवर आदळली़ या विचित्र अपघातात बसमधील प्रवाशांसह एकूण १५ जण जखमी झाले असून

पारगाव : मालवाहतूक ट्रकने अचानक ब्रेक मारले आणि एकामागून एक पाच वाहने एकमेकांवर आदळली़ या विचित्र अपघातात बसमधील प्रवाशांसह एकूण १५ जण जखमी झाले असून, पाच गंभीर जखमींना बीड येथील रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते़ हा अपघात मंगळवारी सकाळी पारगाव (ता़वाशी) येथे घडला असून, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथून औरंगाबादकडे जाणारा मालट्रकच्या (क्ऱआऱजे़१९- जे़डी़६७३८) समोरील वाहनाने पारगाव नजीक अचानक ब्रेक मारले़ हा ट्रक पुढील वाहनावर आदळला़ या ट्रकच्या पाठीमागून आलेली ट्रक (क्ऱआऱजे़१९- जी़डी़७१६५ व आऱजे़१९- जे़डी़५२८६), या समोरील वाहनांवर आदळल्या़ त्यापाठोपाठ आलेली राज्य परिवहन महामंडळाची सोलापूर- मलकापूर ही बस (क्ऱएम़एच़१४- सी़पी़४९२१) ही ट्रकवर आदळली़ तर बसच्या पाठीमागून आलेला टेम्पो (क्ऱएम़एच़१४- सी़पी़४९२१) हा बसवर आदळला़ एकापाठोपाठ पाच वाहने एकमेकांवर आदळल्याने १२ जण जखमी झाले़ यात बसमधील अशोक प्रभाकर शिंदे (वय-३८ रा़पाटोदा), राधाकिसन अंबादास पेंढारे (वय-५० रा़तलवडा), माया सुभाष शिंदे (वय- ५५ रा़पाटोदा), वर्षा विशाल शेंडगे (वय-२६ रा़तुगाव), शाम गोविंद कुलकर्णी (वय- ६८ राक़न्हेरवाडी) या पाच प्रवाशांना पुढील उपचारासाठी बीडकडे पाठविण्यात आले़ तर रणजित वामनराव शिंदे (वय-४० ) व रघुदत्त वामनराव येंदे (वय-३३ दोघे रा़वाशी) या बंधुंना उपचारासाठी वाशी येथे पाठविण्यात आले़ तर सलेम शमशुद्दीन कुरेशी (वय-१६ राक़ोरेगाव), ममता राजेंद्र पालसकर (वय-४२, अमरावती), राजेंंद्र विठ्ठल पालसकर (वय-५०) हे किरकोळ जखमी झाले़ लिमचंद मोहन राठोड (वय-३७ बुलढाणा), अशोक प्रभाकर शिंदे (वय- ४५ रा़पाटोदा), जैनअल अशीद्दीन कुरेशी (वय-१८), रेशम दुर्गा चव्हाण (वय-३५ वाशी) हे जखमी झाले़ तसेच बसचालक डी़एनक़ापडे यांच्या गुडघ्यालाही जखमी झाली असून, त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले़ अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती़ पारगाव येथील ग्रामस्थ आणि वाशी पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली़ या अपघाताची वाशी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (वार्ताहर)