शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातर्फे पाच जणांना ‘जीवनगौरव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:22 IST

विद्यापीठातर्फे प्रशासन, विधि, पत्रकारिता, समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातील पाच मान्यवरांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यापीठातर्फे प्रशासन, विधि, पत्रकारिता, समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातील पाच मान्यवरांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट संशोधन करणाºया प्राध्यापकांच्या नावांची घोषणाही यावेळी करण्यात आली.विद्यापीठाच्या वर्धापन दिनाला विविध क्षेत्रातील पाच मान्यवरांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्याची परंपरा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सुरू केली आहे. यावर्षी प्रशासनातील दीर्घ अनुभवी सेवानिवृत्त भुजंगराव कुलकर्णी, विधि क्षेत्रातील न्यायमूर्ती सी. एल. थुल, सामाजिक कार्यातील डॉ. विश्वनाथ कराड, पत्रकारितेतील ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर शिंगोटे आणि शिक्षण क्षेत्रातील डॉ. जगन्नाथ पाटील यांना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.प्रास्ताविक करताना कुलगुरू म्हणाले, विविध क्षेत्रात मोलाचे कार्य करणाºया मान्यवरांचा गौरव विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे. हा ज्ञानवंतांचा सत्कार आहे. पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या सन्मानपत्राचे लेखन डॉ. दासू वैद्य, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. क्रांती व्यवहारे, डॉ. उत्तम अंभोरे, डॉ. भारती गोरे, संजय शिंदे यांनी केले. तर सन्मानपत्राचे वाचन प्रा. पराग हासे, डॉ. मुस्तजिब खान, डॉ. अपर्णा अष्टपुत्रे, डॉ. सोनाली क्षीरसागर यांनी केले. डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांनी आभार मानले. यावेळी परीक्षा मंडळाचे संचालक डॉ.राजेश रगडे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच अरविंद भालेराव, सचिन चव्हाण, यशपाल साळवे, दिनेश कोलते, दिवाकर पाठक, प्रा. सचिन भालशंकर यांना उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आले. कार्यक्रमाला प्राध्यापक, विभागप्रमुख, विद्यार्थी मोठ्य संख्येने उपस्थित होते.