शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अत्याधुनिक रुग्णालयासाठी पाच मजली वास्तू साकारणार

By admin | Updated: December 5, 2014 00:53 IST

हणमंत गायकवाड , लातूर पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी तत्वत: मान्यता दिली असून,

हणमंत गायकवाड , लातूरपंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी तत्वत: मान्यता दिली असून, या हॉस्पिटलची ५ मजली स्वतंत्र वास्तू साकारणार आहे. केंद्र शासनाच्या बांधकाम एजन्सीने जागेची पाहणी केली असून, आराखडाही तयार केला आहे.पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात औरंगाबाद, यवतमाळ, अकोला आणि लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी २१० खाटांचे स्वतंत्र सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर केले आहे. जागा राज्य शासनाची आणि बांधकाम खर्च केंद्र शासनाचा असणार आहे. १५० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक हॉस्पिटल बांधून दिले जाणार आहे. या हॉस्पिटलमध्ये एकूण ७ विभाग असणार आहेत. त्यात कार्डियोलॉजी (हार्ट), सीव्हीटीसी कार्डियो व्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी, न्युरॉलॉजी (मेंदू विकार), न्यूरोसर्जरी, नेफ्रॉलॉजी (किडणी), नेप्थॉलॉजी (नवजात), प्लॅस्टिक अ‍ॅण्ड बर्न (जळित रुग्ण) या सात विभागांचा त्यात समावेश असेल. या विभागात प्रती ५० खाटा असतील. शिवाय, दहा खाटा क्रिटीकल रुग्णांसाठी असतील. रुग्णालयाच्या बांधकामासाठी ८० कोटी आणि यंत्र सामुग्रीसाठी ७० कोटींचा खर्च केंद्र शासनाच्या वतीने केला जाणार आहे. बांधकामाची सर्व जबाबदारी केंद्र शासनाने घेतली असून, केंद्राच्या बांधकाम एजन्सीने लातुरातील स्त्री रुग्णालय परिसरातील जागेची पाहणी करून रुग्णालयाचा आराखडाही तयार केला आहे. आॅल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट (एम्स) च्या धर्तीवर रुग्णालय होणार आहे. केंद्र शासन बांधकाम आणि यंत्रसामुग्रीचा खर्च करणार असून, मनुष्यबळ आणि देखभाल दुरुस्ती राज्य शासनावर सोपविण्यात आली आहे. औरंगाबाद आणि लातुरात पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेतून हे हॉस्पिटल बांधून मिळणार असल्याची माहिती अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत गोरे यांनी दिली. ४तत्कालीन कस्तुरबा गांधी स्त्री रुग्णालयाच्या जागेत सध्या जिल्हा शल्य चिकित्सक, औषधी भांडार व सर्वोपचार रुग्णालयाचा नेत्र विभाग आहे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयालगत विक्रीकर कार्यालय आहे. या सर्व कार्यालय प्रमुखांची जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी बैठक घेतली असून, त्यांना जागा खाली करण्यासंदर्भात सुचित केले आहे. पुढील दोन दिवसांत पुन्हा जिल्हाधिकारी त्यांची बैठक घेऊन म्हणणे जाणून घेणार आहेत. मार्च-एप्रिल २०१५ मध्ये या जागेवर प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. ४सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामासाठी केंद्राने मोठा निधी देण्यासाठी मान्यता दिली असली तरी दोन एकर जागेची अट घातली होती. दरम्यान, महाविद्यालयाने जुन्या कस्तुरबा गांधी रुग्णालयासह जिल्हा शल्य चिकित्सक व विक्रीकर विभागाच्या कार्यालयाची जागा दाखविल्याने केंद्राने मंजुरी दिली आहे. परंतु, ऐतिहासिक वास्तूचा अडसर आहे. कस्तुरबा गांधी रुग्णालयाची इमारत १९३२ ची आहे. ती वास्तू ऐतिहासिकमध्ये येते का यासंबंधीची पडताळणी जिल्हाधिकाऱ्यांकडून सुरू आहे.