शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांत पाच पोलीस निरीक्षक

By admin | Updated: August 8, 2016 00:38 IST

भोकरदन : भोकरदन पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीचा खेळ सुरूच आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये या ठाण्याला पाच

भोकरदन : भोकरदन पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीचा खेळ सुरूच आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये या ठाण्याला पाच पोलिस निरीक्षक लाभले. ७ आॅगस्ट रोजी संजय लोहकरे यांच्या जागी सहाय्यक पोलिस निरीक्षक गोकुळसिग बुंदेले यांनी पदभार घेतला आहे़भोकरदन पोलीस ठण्यात गेल्या तीन महिन्यांपूर्वी रामेश्वर रेंगे यांनी १६ मे २०१६ पर्यंत कार्यभार सांभाळला होता. त्यांनी भोकरदन येथील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यानंतर त्यांची घनसावंगीला बदली करण्यात आली. त्यांच्या जागी महेंद्र जगताप यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानी या ठाण्याचा आठ दिवस पदभार संभाळला त्यानंतर त्यांची पुणे येथे बदली करण्यात आली. त्यानंतर या ठाण्याचा पदभार जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. त्यानंतर यशवंत बागुल यांची ६ जून रोजी भोकरदन येथे बदली करण्यात आली त्यांनी एक ते दोन दिवस भोकरदन पोलिस ठाण्याचा पदभार संभाळला. त्याच वेळी मंठा येथे कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांची ८ जूनला भोकरदनला बदली करण्यात आली होती. लोहकरे यांनी दोन महिने या ठाण्याचा पदभार संभाळला. त्यानंतर ६ आॅगस्ट रोजी पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी संजय लोहकरे यांची मुख्यालयात बदली केली, मात्र आता भोकरदन पोलीस ठाण्याला कोण पोलीस निरीक्षक द्यावा असा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांसमोर पडला होता. अखेर जालना शहरातील एका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळसिंग बुंदेले यांची भोकरदन पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. बुंदेले यांनी ७ आॅगस्ट रोजी दुपारी ११ वाजता संजय लोहकरे यांच्याकडुन पदभार घेतला आहे़ त्याच प्रमाणे पारध पोलिस ठाण्यात गेल्या एक महिन्यापूर्वीच बदलून आलेले राजीव तळेकर यांची तडकाफडकी जालना येथे बदली करण्यात आली आहे. त्याच्या जागी भागवत यांची नेमणूक करण्यात आल्याचे समजते तर भोकरदन पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार अंतरफ यांची परतूर येथे बदली करण्यात आली आहे़ भोकरदन पोलिस ठाण्याचा पदभार घेतलेले बुंदेले यांच्यासमोर भोकरदन पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील ढासाळलेली कायदा व सुव्यवस्था, अवैध धंदे, वाळू चोरी, दबंगगिरी, अवैध दारू विक्री, रस्त्यावरील अस्ताव्यस्त वाहने, भुरट्या चोराचा बंदोबस्त करण्याचे आव्हान राहणार आहे़ (वार्ताहर)