शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
3
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
4
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
5
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
6
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
9
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
10
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
11
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
12
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
13
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
14
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
15
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
16
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
17
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
18
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
20
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल

२४ तासात औरंगाबादमधून पाच बेपत्ता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 17:01 IST

गेल्या २४ तासात शहराच्या वेगवेगळ्या भागातील दोन पुरुष, एक मुलगी आणि दोन तरुणी अशी पाच जण बेपत्ता झाले आहेत.  

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. ५ : शहरातून महिला, पुरूष आणि अल्पवयीन मुली गायब होण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. गेल्या २४ तासात शहराच्या वेगवेगळ्या भागातील दोन पुरुष, एक मुलगी आणि दोन तरुणी अशी पाच जण बेपत्ता झाले आहेत.  

नंदनवन कॉलनीतील रहिवासी हर्षदा उर्फ गौरी दिलीप गोरखा (१८,) ही तरुणी ३ ऑगस्ट रोजी दुपारी छावणी येथे मामाच्या घरी जाऊन आजीला भेटून येते असे सांगून मोपेड घेऊन घरातून बाहेर पडली. छावणीत आजीला भेटल्यानंतर आईला गाडी देऊन परत येते, असे सांगून ती तेथून निघून गेली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तिच्या आईच्या मोबाईलवर तिने फोन केला. यावेळी तिच्या फोनवरून राहुल नावाचा तरूण बोलला आणि हर्षदा त्याच्यासोबत असल्याचे तो म्हणाला. मात्र, दुस-या दिवशीही ती घरी न परतल्याने तिच्या आईने छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. हर्षदा उर्फ गौरी हिचा रंग गोरा, उंची ५फु ट,अंगावर काळी पॅण्ट आणि भगवे जॅकेट असे तिचे वर्णन आहे. शिवाय तिच्याजवळ  एमएच २० सीजे ५८४१ या क्रमांकाची मोपेड आहे.

बालगृहातील मुलगी बेपत्ताछावणीतील विद्यादीप बालगृहातील वर्षा भरत गायके ही १७ वर्षीय तरूणी ४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरापासून बेपत्ता झाली. ७ जानेवारी रोजी ती मिलकॉर्नर परिसरात आढळल्यानंतर तिला पोलिसांनी विद्यादीप बालगृहात दाखल केले होते. दरम्यान ती अचानक बेपत्ता झाल्याने बालगृहाच्या अधिक्षिका सिस्टर विन्सटीना यांनी छावणी ठाण्यात तक्रार नोंदविली. वर्षा हिची उंची १५०सेंटीमिटर,रंग सावळत्त, अंगावर जांभळी फुले असलेला पिवळा पंजाबी ड्रेस, पायजमा ,मराठी,हिंदी बोलते,असे तिचे वर्णन आहे. 

रंजना दिपक सोनवणे (२७,रा. उस्मानपुरा, नागसेननगर) हि विवाहिता ३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता मुकुंदवाडीत माहेरी राहत असताना बेपत्ता झाली. ३ रोजी घरी भांडी धुण्याचे काम करीत होती. आई-वडिल घरी नसल्याचे पाहून ती घरातून निघून गेली. दुस-या दिवशीही ती परतली नाही आणि नातेवाईकांकडेहि न गेल्याने तिचे वडिल विष्णू जाधव यांनी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली. तिचा रंग सावळा, उंची साडेपाच फुट, सडपातळ बांधा, केस काळे, अंगावर साडी आणि ब्लाऊज असे तिचे वर्णन आहे. 

संजयनगर येथील अमोल नारायण महादाने (२५) हा तरुण ४ ऑगस्ट रोजी दुपारपासून बेपत्ता झाला. अमोल नातेवाईकांकडे न आढळल्याने त्याची आई संगीता महादाने यांनी जिन्सी ठाण्यात तक्रार नोंदविली. संजय यांची उंची५ फुट २ इंच, रंग सावळा, अंगावर निळी चौकडी शर्ट, निळी पॅण्ट, चप्पल, चेहरा गोल, त्वचा लालसर असे त्याचे वर्णन आहे. या वर्णनाचा तरूणकोणास आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस नाईक उगले यांनी केले.

अन्य एका घटनेत मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातील रहिवासी राजू बाजीराव घुले (३५) हे ३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेपासून बेपत्ता झाले.  नातेवाईक आणि मित्रांकडे न आढळल्याने विमल राजू घुले यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. राजू यांचा चेहरा लांबट, रंग सावळा, उंची साडेपाच फुट, सडपातळ बांधा, पायात सॅण्डल, केस काळे असे त्याचे वर्णन आहे. पोलीस नाईक जाधव हे पुढील तपास करत आहेत.