शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

पाचशे गावांना चारशे टँकरने पाणी

By admin | Updated: June 2, 2014 01:35 IST

औरंगाबाद : मेअखेरीस मराठवाड्यातील पाणीटंचाईने आणखीनच भीषण स्वरूप धारण केले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत विभागातील टँकरची संख्या १४४ ने वाढली आहे.

औरंगाबाद : मेअखेरीस मराठवाड्यातील पाणीटंचाईने आणखीनच भीषण स्वरूप धारण केले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत विभागातील टँकरची संख्या १४४ ने वाढली आहे. सध्या विभागात एकूण ३९५ टँकरच्या माध्यमातून पाचशे गावांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात यंदाही जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र, सुरुवातीला टंचाईची तीव्रता काही गावांपुरतीच मर्यादित होती. एप्रिल महिन्यापासून ही तीव्रता वाढली असून, दिवसेंदिवस नवनवीन गावे पाणीटंचाईच्या फेर्‍यात येत आहेत. मागील आठवड्यात मराठवाड्यात २५१ टँकर सुरू होते. चालू आठवड्यात ही संख्या ३९५ झाली आहे. परभणी आणि हिंगोली हे दोन जिल्हे वगळता इतर सहा जिल्ह्यांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १३५ गावांना १७७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर सर्वात कमी ५ टँकर लातूर जिल्ह्यात सुरू आहेत. टँकरशिवाय अनेक गावांत त्याच ठिकाणी विहिरी अधिग्रहित करूनही पाणीपुरवठा केला जात आहे. विभागात एकूण ६९९ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २३९, जालना जिल्ह्यात १६, नांदेड जिल्ह्यात १४, बीड जिल्ह्यात २६६, लातूर जिल्ह्यात ४५ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ११९ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मागील आठवड्यात अधिग्रहित विहिरींची संख्या ३७२ होती. चालू आठवड्यात त्यात आणखी ३२७ ची भर पडली आहे. सध्या अधिग्रहित करण्यात आलेल्या ६९९ विहिरींपैकी २०० विहिरी या टँकर भरण्यासाठी अधिग्रहित केल्या गेल्या आहेत. जिल्हाटँकर औरंगाबाद१७७ जालना०७ नांदेड१७ बीड१२९ लातूर०५ उस्मानाबाद६० एकूण३९५