लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरण मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या पाच पदाधिकाºयांना सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी सोमवारी तडकाफडकी निलंबित केले. या कारवाईचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटण्याची शक्यता आहे.कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित समस्यांसाठी हे पदाधिकारी २४ जुलै रोजी १२ वाजेच्या सुमारास बकोरिया यांच्या दालनात गेले होते, तेव्हा बकोरिया यांनी शिष्टमंडळाला विचारले की, मला भेटण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेतली आहे का? तेव्हा पदाधिकाºयांनी कर्मचाºयांच्या समस्यांकडे आपले लक्ष वेधण्यासाठी आम्ही आलो आहोत,असे सांगितले; मात्र बकोरिया यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही व थेट त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या घटनेमुळे महावितरणमधील सर्वच कर्मचारी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकाºयांमध्ये मागासवर्गीय विद्युत कर्मचारी परिमंडळ संघटनेचे अध्यक्ष गौतम पगारे, सचिव आशुतोष शिरोळे, केंद्रीय कार्यकारिणी महिला सदस्य रूपाली पहूरकर, राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ पाटील व कार्यकारी अभियंता भारती यांचा समावेश आहे.यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाºयांचे म्हणणे आहे की, बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे. याकडे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांचे लक्ष वेधले होते; परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आम्हाला बकोरिया यांच्याकडे जावे लागले.परवानगीची गरज नाहीकर्मचाºयांच्या प्रश्नांवर वरिष्ठांना भेटण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाºयांना परवानगी घेण्याची गरज नाही किंवा तसा लिखित नियमही नाही. महावितरणमधील कर्मचाºयांच्या बदल्यांमध्ये अनियमितता झाली आहे.
महावितरणमधील पाच कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:35 IST