शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

हज यात्रेतील महत्त्वाचे पाच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:08 IST

हज यात्रेदरम्यान महत्त्वाचे पाच दिवस कोणते. या पाच दिवसांमध्ये कोणते विधी भाविकांना पार पाडावे लागतात, याची इत्थंभूत माहिती रविवारी मराठवाड्यातील यात्रेकरूंना देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हज यात्रेदरम्यान महत्त्वाचे पाच दिवस कोणते. या पाच दिवसांमध्ये कोणते विधी भाविकांना पार पाडावे लागतात, याची इत्थंभूत माहिती रविवारी मराठवाड्यातील यात्रेकरूंना देण्यात आली. जामा मशीद परिसरातील सईद हॉल येथे तिसरे प्रशिक्षण शिबीर उत्साहात पार पडले.सकाळी नऊ वाजता प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. जामा मशीदचे इमाम जाकेर साहब यांनी पवित्र कुराण पठण केले. डॉ. हाफीज नरूल फैसल यांनी नात सादर केली. शिबिराच्या पहिल्या सत्रात मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटीचे मौलाना नसीमउद्दीन मुफ्ती यांनी हज यात्रेतील पाच दिवस या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, हज यात्रा फर्ज असून, इबादत समजून भाविकांनी ती पूर्ण करायला हवी. शिबिराच्या दुसऱ्या सत्रात प्रा. शेख अब्दुल खालेक यांनी हज यात्रेतील प्रमुख पाच दिवस कशासाठी महत्त्वाचे आहेत, यावर सविस्तर विवेचन केले. हज यात्रेसाठी तयारी कशी करावी, विधी कोणते महत्त्वाचे आहेत. हज यात्रेत कोणती इबादत करावी, दुआ आदी विषयांवर त्यांनी भाविकांना साध्या सरळ आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.हज यात्रेतील महत्त्वाची बाब म्हणजे ‘उमरा’होय. उमरा कशा पद्धतीने करावे यावरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. हज यात्रेत वस्त्र फक्त अहेराम धारण करावे लागते. ते कशा पद्धतीने घालावे याचीही माहिती देण्यात आली. सायंकाळी ४ वाजता शिबिराचा समारोप करण्यात आला. मराठवाड्यातील तब्बल १४०० पेक्षा अधिक भाविकांनी यात सहभाग घेतला.

टॅग्स :Haj yatraहज यात्राIslamइस्लाम