शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत एमआयएमचे पाच नगरसेवक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : महापौरांवर खुर्ची भिरकावल्याच्या प्रकरणात एमआयएमच्या दोन नगरसेवकांची शुक्रवारी थेट हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आलेली ...

ठळक मुद्देअतिक्रमण हटाव कारवाई अंगलट : विरोधी पक्षनेता, गटनेत्यासह तीन जणांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापौरांवर खुर्ची भिरकावल्याच्या प्रकरणात एमआयएमच्या दोन नगरसेवकांची शुक्रवारी थेट हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आलेली असताना शनिवारी महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहात पाच नगरसेवकांनी अतिक्रमण हटावच्या कारवाईत हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे त्वरित पाठवून देण्याचे आदेशही महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. शासनानेही उद्या नगरसेवक पद रद्द करण्यास हिरवा कंदिल दाखविला तर एमआयएम पक्ष संकटात सापडणार आहे.या पाच जणांचे पद जणारच्विरोधी पक्षनेता फेरोज खान, गटनेता नासेर सिद्दीकी, नगरसेवक जमीर कादरी, नगरसेविका सरवत बेगम आरेफ हुसैनी, साजेदा सईद फारुकी यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला. कारवाईत नगरसेविका सरवत बेगम यांचे पती आरेफ हुसैनी, साजेदा बेगम यांचे पती सईद फारुकी हस्तक्षेप करीत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूरच्तब्बल पाच तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी सायंकाळी जाहीर केले की, दमडी महल प्रकरणात एमआयएमच्या नगरसेवकांनी, त्यांच्या नातेवाईकांनी कारवाईत हस्तक्षेप केल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. यापूर्वीही मनपा अधिकाºयांना धमकावणे, अनधिकृत बांधकामांमध्ये हस्तक्षेप करणे, आदी असभ्य वर्तणूक नगरसेवकांनी केलेली आहे. महाराष्टÑ महापालिका अधिनियम १०-१-ड नुसार दोषी नगरसेवकांवर कारवाई करावी. कलम १०-१-१-अ अनुसार शासनाकडे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी पाठविण्यात यावे, असा ठराव मंजूर केला. हा ठराव त्वरित शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था आयुक्तांनी कारवाई असेही त्यांनी नमूद केले.जागा शासनाची अन्...रस्ता रुंदीकरणात श्रीराम पवार यांचे घर मनपाकडून पाडण्यात आले. नेमकी ही जागा कोणाच्या मालकीची होती, असा प्रश्न नगरसेवक जंजाळ यांनी उपस्थित केला. नगररचना विभागाचे सहायक नगररचनाकार जयंत खरवडकर उत्तर देण्यासाठी उभे राहताच नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी त्यांना कडाडून विरोध केला. त्यांची नियुक्तीच नगररचनामध्ये नसताना ते उत्तर कसे देणार? यावर उपअभियंता ए.बी. देशमुख यांनी उत्तर दिले. मूळ जागा महसूल विभागाची होती, असे त्यांनी सभागृहात सांगितले. महापालिकेने परस्पर जागा कशी ताब्यात घेतली. महसूल विभागाने महापालिकेला आमच्या जागेवरील अतिक्रमण काढा, असे पत्र दिले होते का? मनपा परस्पर जाऊन जागा कशी काढू शकते. यावर प्रशासन निरुत्तर झाले.