हिंगोली : दहावीच्या परिक्षेत जिल्ह्यातील पाच तालुक्यांपैैकी सेनगाव तालुक्याचा सर्वाधिक म्हणजे ८४.७१ टक्के निकाल लागला असून सर्वात कमी म्हणजे ७४.३५ टक्के निकाल कळमनुरीचा लागला आहे.वसमत तालुक्याचा ८३.४२ टक्के तर औंढा नागनाथ तालुक्याचा ८३.६२ टक्के निकाल लागला आहे. हिंगोली तालुक्याचा ८१.१३ टक्के निकाल लागला आहे. हिंगोली तालुक्यातील ३ हजार १८० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली त्यापैकी २ हजार ५८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हिंगोली तालुक्याचा शाळानिहाय निकाल असा- जिल्हा परिषद बहुउद्देशिय प्रशाला हिंगोली ४६.५८ टक्के, जि.प. कन्या शाळा हिंगोली ७४.१९ टक्के, शांताबाई मुंजाजी दराडे विद्यालय ८२.५३ टक्के, माणिक स्मारक विद्यालय ८६.९० टक्के, सरजुदेवी आर्य कन्या विद्यालय ९०.२१ टक्के, संभाजी विद्यामंदिर ३३.३३ टक्के, खाकीबाबा इंग्लिश स्कुल १०० टक्के, मौलाना आझाद उर्दु हायस्कुल ९५.९५ टक्के, गोदावरीबाई कागलीवाल विद्यालय ९६.७७ टक्के, गुलाम नबी आझाद उर्दु हायस्कुल ७२.७३ टक्के, शंकरराव चव्हाण उर्दु हायस्कुल ८७.१५ टक्के, सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कुल ९६.४३ टक्के, जि. प. शाळा कनेरगाव नाका ७४.३९ टक्के, जि. प. शाळा खंडाळा ७८.८५ टक्के, जि. प. शाळा नर्सी नामदेव ६६.४० टक्के, गांधी विद्यामंदिर माळधामणी ६३.६४ टक्के, स्वामी विवेकानंद विद्यालय डिग्रस ७९.१७ टक्के, पानेरकर विद्यामंदिर हिंगणी ७२.९७ टक्के, मुंदडा विद्यालय सिरसम बु. ८६.०३ टक्के, पालेश्वर विद्यालय फाळेगाव ९५.८३ टक्के, सुखदेवानंद विद्यालय भांडेगाव ९४.१५ टक्के, विद्यासागर विद्यालय खानापूर चित्ता ६९.४७ टक्के, अन्नपुर्णा विद्यालय बासंबा ८४.८५ टक्के, धनसिंग नाईक विद्यालय पेडगाव ८७.८८ टक्के, महाराष्ट्र विद्यालय माळहिवरा ६५ टक्के, श्रीराम पवार माध्यमिक आश्रम शाळा ८५.३७ टक्के, पांडुरंग माध्यमिक विद्यालय समगा ९५.६५ टक्के, संत नामदेव महाराज विद्यालय अंतुलेनगर ७९.४१ टक्के, जयभारत विद्यालय बळसोंड ८४.६२ टक्के, जिजामाता विद्यालय वडद ८६.४९ टक्के, आदर्श माध्यमिक विद्यालय हिंगोली ८६.२१ टक्के, संत सेवालाल महाराज विद्यालय पळसोना २७.२७ टक्के, पवित्रेश्वर विद्यालय कारवाडी ८१.९४ टक्के, मिराताई विद्यालय सवड ८३.८२ टक्के, गुरूदास कामत विद्यालय इंचा ७६.४७ टक्के, कोर्णाक विद्यालय कनका ५५.५६ टक्के, महात्मा फुले विद्यालय कनेरगाव नाका ९२.७३ टक्के, उर्दु शाळा नर्सी नामदेव ९०.९१ टक्के, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय हिंगोली २५ टक्के, सत्य गणपती माध्यमिक विद्यालय सरकळी ० टक्के, विवेकानंद ज्ञानपीठ हायस्कुल लिंबाळा ८९.४७ टक्के.कळमनुरी तालुका- तालुक्यातून २ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार ९४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा शाळानिहाय निकाल असा- जि.प. हायस्कुल कळमनुरी ६९.७७ टक्के, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय कळमनुरी ६४.६५ टक्के, गुलाम नबी आझाद उर्दु हायस्कुल कळमनुरी ७१.२० टक्के, शंकरराव सातव माध्यमिक विद्यालय कळमनुरी ७०.९२ टक्के, जि.प. शाळा आखाडा बाळापूर ६५.२९ टक्के, राजर्षी शाहू विद्यालय आखाडा बाळापूर ६८.३७ टक्के, जि. प. शाळा डोंगरकडा ९० टक्के, बापुराव देशमुख हायस्कुल डोंगरकडा ६९.९२ टक्के, जि. प. शाळा कुर्तडी १०० टक्के, जि. प. शाळा शेवाळा ५६.१४ टक्के, जि. प. शाळा वाकोडी ८०.९५ टक्के, जि. प. शाळा येहळेगाव तु. ३२.१४ टक्के, आश्रमशाळा रामेश्वर तांडा ६८.६३ टक्के, जि.प. शाळा मसोड ६१.९० टक्के, वसंतराव नाईक आश्रमशाळा वारंगा फाटा ९१.५८ टक्के, शासकीय आश्रमशाळा गोटेवाडी ६५.५० टक्के, शासकीय आश्रमशाळा जामगव्हाण ५१.४३ टक्के, शासकीय आश्रमशाळा बोथी १०० टक्के, मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालय कवडा ७७.०८ टक्के, महात्मा फुले विद्यालय कामठा फाटा ७७.८९ टक्के, बालाजी विद्यालय वाई ८०.६५ टक्के, गोकुळ विद्यालय येहळेगाव गवळी ८८.६८ टक्के, भारतरत्न राजीव गांधी विद्यालय कोंढूर ७८.५७ टक्के, एन.जी. माध्यमिक विद्यालय सालेगाव ७५.७६ टक्के, हिरामन खंडारे विद्यालय खरवड ६२.५० टक्के, छत्रपती शिवाजी विद्यालय दांडेगाव ९२.४२ टक्के, शिवाजी विद्यालय कांडली ९५.६५ टक्के, शिवपुरी महाराज विद्यालय नांदापूर ९५.३५ टक्के, शंकरराव सातव विद्यालय जवळा पांचाळ ७४.३६ टक्के, संत देवकामाता माध्यमिक विद्यालय हिवरा बु. ९४.४४ टक्के, संत तुकाराम महाराज माध्यमिक विद्यालय सुकळी वीर ८३.७८ टक्के, गंगाबाई विद्यालय जांब ७७.२७ टक्के, आश्रमशाळा वरूड तांडा ६७.०१ टक्के, शारदा आदिवासी आश्रमशाळा ढोलक्याची वाडी ८६.८४ टक्के, जटाशंकर माध्यमिक विद्यालय वडगाव ९३.३३ टक्के, शिवरामजी मोघे सैनिकी शाळा कळमनुरी ८३.८७ टक्के, कोर्णाक केंद्रीय माध्यमिक निवासी आश्रमशाळा देवजना ० टक्के, सोनीया गांधी उर्दु हायस्कुल आखाडा बाळापूर ८९.४७ टक्के, देवकृपा माध्यमिक विद्यालय वारंगा फाटा ९३.५५ टक्के, माध्यमिक विद्यालय बाभळी ९४.२९ टक्के, हरुनिसा उर्दु माध्यमिक विद्यालय बाळापूर १०० टक्के.वसमत तालुका- तालुक्यातील ३ हजार ५७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २ हजार ९८६ विद्यार्थी उर्त्तीण झाले. तालुक्याचा शाळानिहाय निकाल असा- बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत ८६.२६ टक्के, विवेक वर्धिनी हायस्कुल वसमत ९१.३० टक्के, सिद्धेश्वर विद्यालय वसमत ९५.७९ टक्के, सरस्वती निकेतन हायस्कुल वसमत ७४.६२ टक्के, महात्मा गांधी विद्यालय वसमत ८५.१९ टक्के, शिवाजी विद्यालय साखर कारखाना ८१.८२ टक्के, अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय वसमत ९८.७६ टक्के, जि. प. शाळा हट्टा ८०.५२ टक्के, जि. प. शाळा हयातनगर ७०.७३ टक्के, गोरखनाथ विद्यालय आंबा चोंढी ८७.५५ टक्के, बहिर्जी स्मारक विद्यालय गिरगाव ७९.१७ टक्के, बहिर्जी स्मारक विद्यालय वापटी ८० टक्के, अन्नपुर्णा देवी विद्यालय आरळ ७६.०६ टक्के, निवासी हायस्कुल बाराशिव ८३.३३ टक्के, नरहर कुरूंदकर विद्यालय कुरूंदा ७८.४१ टक्के, मंगेश्वर माध्यमिक शाळा सातेफळ ७५.९० टक्के, दनकेश्वर विद्यालय आडगाव ७३.५८ टक्के, अहिल्यादेवी होळकर विद्यालय सिरळी ९८.०४ टक्के, माणकेश्वर विद्यालय कवठा ७३.६८ टक्के, शिवाजी विद्यालय सावंगी ८०.४३ टक्के, चक्रधर स्वामी माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी ८४.४५ टक्के, चतुरमुखी विनायक माध्यमिक विद्यालय आसेगाव ८८.८९ टक्के, संत श्री बाबुराव माध्यमिक विद्यालय करंजाळा ६३.१६ टक्के, रमेश वडपुरकर विद्यालय खांडेगाव ८७.६९ टक्के, वरपुडकर विद्यालय वाखारी ९५.२४ टक्के, रोकडेश्वर विद्यालय पांग्रा शिंदे ८७.५० टक्के, कै. झुंजाजी पाटील इंगळे उर्दु विद्यालय कुरूंदा ९३.७५ टक्के, कै. पुंजाजी पाटील माध्यमिक विद्यालय सुकळी ८३.३३ टक्के, सानिया उर्दु माध्यमिक हायस्कुल वसमत ८४.६२ टक्के, स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय पळसगाव ९३.१८ टक्के, सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय हट्टा ९४.२१ टक्के, कै. कांचनदेवी माध्यमिक विद्यालय अकोली ७५ टक्के, अनुदानित माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा सिरळी ७७.१४ टक्के, हजरत खान आलम उर्दु शाळा वसमत ७५.५१ टक्के, छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय पार्डी बु. ९६.७७ टक्के, टोकाई माध्यमिक विद्यालय किन्होळा ८२.९३ टक्के, सह्याद्री हायस्कुल वसमत १०० टक्के.सेनगाव तालुका- तालुक्यातील १ हजार ७९२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळानिहाय निकाल असा- जि.प. शाळा सेनगाव ६२.६३ टक्के, भानेश्वर विद्यालय सेनगाव ८८.४६ टक्के, जि. प. शाळा आजेगाव ९४.३७ टक्के, जि. प. शाळा गोरेगाव ७०.९३ टक्के, न्यु हायस्कुल गोरेगाव ७५.७६ टक्के, जि. प.शाळा कवठा बु. १०० टक्के, जि. प. शाळा केंद्रा बु. ७५ टक्के, जि. प. शाळा पानकनेरगाव ७७.०५ टक्के, जि. प. शाळा साखरा १०० टक्के, जि. प. शाळा सवना ७३.३३ टक्के, ज्ञानेश्वर विद्यालय वरुड चक्रपान ८९.६७ टक्के, श्री संगमेश्वर ज्ञानमंदिर पुसेगाव ७५.५१ टक्के, डॉ. सलीम झकेरिया उर्दु हायस्कुल पुसेगाव ८० टक्के, जयभारत विद्यालय जवळा बु. ९१.५१ टक्के, सावित्रीबाई फुले विद्यालय आडोळ ८७.१० टक्के, श्री संगमेश्वर ज्ञानमंदिर जयपूर १०० टक्के, होळकर विद्यालय खडकी ९५ टक्के, सर्वाेदय विद्यालय खुडज ८० टक्के, लोकमान्य विद्यालय बाभुळगाव ८९.२९ टक्के, रमतेराम महाराज विद्यालय कडोळी ९१.८० टक्के, रुख्मिणी विद्यालय पळशी ९८.३१ टक्के, देवकृपा विद्यामंदिर हत्ता ९७.०६ टक्के, महाकाली माध्यमिक आश्रमशाळा हत्ता ९२.९६ टक्के, कै. बाबुराव पाटील विद्यालय सापटगाव ९० टक्के, संत नामदेव माध्यमिक विद्यालय वाघजाळी १०० टक्के, राजर्षी शाहू महाराज विद्यालय शेगाव ८१.८२ टक्के, कै. बाबुराव पाटील माध्यमिक विद्यालय गुगळपिंप्री ९७.२२ टक्के, ओमप्रकाश देवडा माध्यमिक विद्यालय सेनगाव ८९.७१ टक्के, विद्यानिकेतन विद्यालय कोळसा ९०.३२ टक्के, अमृतराव पाटील विद्यालय केंद्रा बु. ८२.४६ टक्के, माध्यमिक आश्रमशाळा बाभुळगाव १०० टक्के, संत ज्ञानेश्वर विद्यालय ताकतोडा ९३.५५ टक्के, मुकुंद विद्यालय वलाना ३१.३७ टक्के.औंढा नागनाथ तालुका- तालुक्यातील १ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार २९१ विद्यार्थी उर्त्तीण झाले. शाळानिहाय निकाल असा- जि.प. शाळा औंढा नागनाथ ५५.५६ टक्के, नागनाथ विद्यालय औंढा ७८.५७ टक्के, राजीव गांधी उर्दु विद्यालय औंढा नागनाथ ७८.२६ टक्के, माध्यमिक आश्रमशाळा औंढा नागनाथ ८९.२२ टक्के, जि.प. शाळा येहळेगाव सोळंके ७५.३८ टक्के, मधोमती विद्यालय लाख ८१.५८ टक्के, जि.प. शाळा जवळा बाजार ६०.८७ टक्के, इंदिरा गांधी कन्या विद्यालय जवळा बाजार ९४.२३ टक्के, जि.प. शाळा शिरडशहापूर ६८.६६ टक्के, शांती विद्यामंदिर शिरडशहापूर ७१.८८ टक्के, आश्रमशाळा गांगलवाडी ७२.९२ टक्के, डॉ. यु.एस. वानखेडे विद्यालय कंजारा ९३.४४ टक्के, महावीर मराठी हायस्कुल पिंपळदरी ८५.७१ टक्के, रामदास आठवले विद्यालय माथा ९२.८६ टक्के, ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय साळना ९६.३० टक्के, कै. रामराव सावंत माध्यमिक विद्यालय वडद ९३.७५ टक्के, धर्मदेव माध्यमिक विद्यालय पोटा बु. ९४.७४ टक्के, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पिंपळदरी ९२ टक्के, सरस्वती आदिवासी आश्रमशाळा नागेशवाडी ९४ टक्के, रेणुका माता विद्यालय चिंचोली ८९.७४ टक्के, शिवनेरी माध्यमिक आश्रमशाळा जवळा बाजार ९२.३१ टक्के, केंद्रीय माध्यमिक निवासी आश्रमशाळा सिद्धेश्वर ९०.६३ टक्के, एमआयपी उर्दु हायस्कुल जवळा बाजार १०० टक्के. (जिल्हा प्रतिनिधी)
सेनगाव तालुक्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक
By admin | Updated: June 18, 2014 01:31 IST