शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

औरंगाबाद जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधित ठणठणीत, घेताहेत काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 18:56 IST

corona virus in Aurangabad राज्यात मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ १५ मार्च रोजी औरंगाबादेत काेरोनाचा शिरकाव झाला.

ठळक मुद्देसर्वसामान्यांप्रमाणे दिनचर्या प्राध्यापिकेकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : प्रारंभीच्या काळात कोरोनाचे नावही घेतले तरी प्रत्येकाची धडधड वाढत होती. शहरात सर्वप्रथम  एक प्राध्यापिकेला कोरोनाची बाधा झाली आणि औषधोपचाराने त्यांनी कोरोनावर विजयदेखील मिळविला. त्या घटनेला ९ महिने होत असून  ‘त्या’ अगदी ठणठणीत आहेत. स्वत:सह कुटुंबियांचीही ‘त्या’ काळजी घेत आहेत. सर्वसामान्यांप्रमाणे त्यांची दिनचर्या सुरू आहे.

राज्यात मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ १५ मार्च रोजी औरंगाबादेत काेरोनाचा शिरकाव झाला. एका शैक्षणिक संस्थेतील प्राध्यापिकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने त्यांच्या संपर्कातील एकालाही बाधा झाला नाही; परंतु त्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना नंतर प्रकृतीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, पहिल्या रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. सध्या त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण  देत आहे.  घराबाहेर कमीत कमी जाऊन त्या काळजी घेत आहेत. केवळ अत्यावश्यक बैठकींना त्या जातात.

अवघ्या ११ व्या दिवशी त्या स्वगृहीया प्राध्यापिका या ३ फेब्रुवारी रोजी रशिया येथे गेल्या होत्या. तेथून त्या ३ मार्च रोजी शहरात परतल्या. प्रकृतीत बिघाड झाल्याने त्या १३ मार्च रोजी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांची लक्षणे आणि प्रवासाच्या माहितीवरून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. तपासणीअंती त्यांचा अहवाल कोरोना सकारात्मक आला. औषधोपचाराने कोरोनामुक्त होऊन अवघ्या ११ व्या दिवशी त्या स्वगृही परतल्या.

कमीत कमी घराबाहेर पडण्यावर कुटुंबियांचा भरत्यांच्या कुटुंबातील अन्य कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळले नाहीत. पहिल्यांदा पॉझिटिव्ह म्हणून जाहीर झाल्यानंतर परिसरातील नागरिक अंतर राखत होते.  रुग्णालय, डॉक्टरांसाठीही कोरोना नवीन होता. तरीही उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. सदर प्राध्यापिकेचा मुलगा डॉक्टर आहे. त्यांनी उपचारात महत्त्वाची भूमिका निभावली. घराबाहेर कमीत कमी पडण्यास कुटुंबियांकडून भर दिला जात आहे.

१५ मार्च रोजी आढळला जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण.प्रत्येक महिन्याला असे वाढले रुग्ण१ एप्रिल    ११ मे    १७७१ जून    १५४३१ जुलै    ५,५६५१ आगस्ट     १४,१२३१ सप्टेंबर     २३,४६०१ आक्टोबर     ३३,६४८१ नोव्हेंबर    ३८,१४११ डिसेंबर    ४३,३७८

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस