शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

फटाक्यांची आतषबाजी अन् जल्लोष

By admin | Updated: May 17, 2014 00:18 IST

उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार प्रा.रवींद्र गायकवाड यांनी सुमारे २ लाख ३४ हजार ३२५ एवढ्या मताधिक्याने विजय मिळविल्या.

उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार प्रा.रवींद्र गायकवाड यांनी सुमारे २ लाख ३४ हजार ३२५ एवढ्या मताधिक्याने विजय मिळविल्यानंतर जिल्हाभरात महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी प्रचंड जल्लोष केला. भूम शहरामध्ये विजयी रॅली काढण्यात आली. उमरगा शहरात आतषबाजी करीत पेढे, साखर वाटप करुन आनंदोत्सव साजरा केला. तसेच परंडा, उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, पारगाव, येरमाळा आदी ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. प्रा. गायकवाड यांच्या या मोठ्या फरकाने झालेल्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून आले. भूम : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड हे विजयी झाल्याची वार्ता भूम शहरामध्ये धडकताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. शुक्रवारी सकाळी ८ वाजता लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर सकाळपासूनच चौकाचौकात कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती. महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याची वार्ता पसरल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. तसेच चौकाचौकात आतषबाजीही करण्यात आली. तसेच ‘आपकी बार मोदी सरकार’ अशा घोषणा देत मिठाईचे वाटप करण्यात आले. यानंतर दुपारी ३ वाजता येथील ओंकार चौकातून विजयी रॅली काढण्यात आली. ही रॅली मेन रोड, नगर परिषद चौक, गांधी चौक आदी भागातून नेण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप शाळू, तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, शहरप्रमुख सुनील माळी, बाळासाहेब क्षीरसागर, आदम शेख, रिपाइंचे सुनील थोरात, प्रल्हाद आडगळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर) उमरगा : उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर शहरामध्ये ठिकठिकाणी विजयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. लोकसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मागील एक महिन्यापासून या विधानसभा मतदारसंघातील मतदारांना निकालाची प्रतीक्षा लागली होती. शुक्रवारी निकालाच्या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासूनच घराघरातील प्रत्येकजण टी.व्ही.समोर बसून निकाल ऐकण्यासाठी आतुर होता. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास प्रा. रवींद्र गायकवाड हे पहिल्या फेरीत ६ हजार मतांनी पुढे असल्याचे वृत्त समजताच शहर व परिसरात आनंदोत्सवास प्रारंभ झाला. येथील शिवाजी चौक, राष्ट्रीय महामार्ग, महादेव रोड, पतंगे रोड, बालाजी नगर, साने गुरुजीनगर, आरोग्यनगर आदी भागात शिवसेना-भाजप-रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या आनंदोत्सवात भाजपाचे संताजी चालुक्य, माधव पवार, नेताजी गायकवाड, डॉ. चंद्रकांत महाजन, आ. ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषद सदस्य कैलास शिंदे, हरिष डावरे, पोपटराव सोनकांबळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, तालुकाप्रमुख बाबूराव शहापूरे, नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, कृउबाचे सुलतान शेठ, जितेंद्र शिंदे, नगरसेवक धनंजय मुसांडे, विलास पतंगे, बाळू शिंदे, पृथ्वीराज दिघे, अशोक तेलंग, लिंगराज स्वामी, किशोर दुबे, प्रशांत कौलगे, सोमनाथ घोडके यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर) परंडा : लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर परंडा शहरातील शिवाजी चौकात भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत मिठाईचे वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अ‍ॅड. संतोष सूर्यवंशी, राजाभाऊ चौधरी, गोपाळ ठाकूर, सुबोधसिंह ठाकूर, मकसूद तुटके, संदीप शहा, चंद्रकांत पवार, सुजीतसिंह परदेशी, अजय पाटील, अब्दुल शेख, जगन्नाथ डाके, विठ्ठल तिपाले, चंद्रकांत काकडे, केशव गाढवे, आदेश तिंबोळे, दिलीप मोडजकर, सचिन करकुटे, नाना माडवे, शरीफ शेख आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान, परंडा शहरासोबतच गावागावात महायुतीचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. अनेक ठिकाणी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. नळदुर्ग : महायुतीचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड विजयी झाल्यानंतर नळदुर्ग शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी करुन पेढे, साखर वाटप करुन आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी क्रांती चौक, मुख्य बाजारपेठे, भोईगल्ली ते बसस्थानकापर्यंत सवाद्य मिरवणूक काढली. मिरवणुकीत शिवसेना तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहराध्यक्ष संतोष पुदाले, रिपाइंचे तालुकाध्यक्ष एस. के. गायकवाड, भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुशांत भूमकर, भाजपा शहराध्यक्ष पद्माकर घोडके, रिपाइंचे शहराध्यक्ष बाबा बनसोडे, शाम कनकधर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर) पारगाव : प्रा. रवींद्र गायकवाड हे विजयी झाल्याची वार्ता समजताच पारगाव येथे दिवाळी साजरी झाली. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी गावातून विजयी रॅली काढली. यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्माधिकारी, तालुका उपप्रमुख तात्यासाहेब बहिर, आनंदराव घुले, हातोला सरपंच कानिफनाथ घुले, दीपक जोगदंड, प्रदीप कोकणे, बंडू मुळे, बाबूराव गावडे, फुलचंद बाराते, अमोल गायकवाड, विकास तळेकर यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान शुक्रवारी पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाल्यापासूनच मतमोजणी केंद्रासह शहराच्या चौकाचौकात फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण सुरू झाली़ पहिल्या फेरीपासून सुरू असलेला हा उत्साह अखेरच्या फेरीपर्यंत कायम होता़ शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या मतदान केंद्रात मतमोजणीदरम्यान दुपारी १२ पर्यंत कार्यकर्त्यांची गर्दी फारशी दिसून आली नाही़ शिवसेनेचे उमेदवार रवींद्र गायकवाड यांना एक लाखाच्या पुढे आघाडी मिळाल्यानंतर मात्र, मतमोजणी केंद्राच्या परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी केली़ राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ़ पद्मसिंह पाटील, राणाजगजितसिंह पाटील, अपक्ष उमेदवार रोहन देशमुख यांनी मतमोजणीनंतर फेरीनिहाय येणारी आकडेवारी पाहून काढता पाय घेतला़ दुसरीकडे पहिल्या फेरीपासूनच शहरातील चौका-चौकात फटाक्यांची आतषबाजी अन् गुलालाची उधळण सुरू झाली होती़ ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरणारे कार्यकर्ते हे चित्र सर्वत्रच दिसून येत होते़ छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबेडकर चौक, नेहरू चौक, बार्शीनाक्यासह शहराच्या विविध भागात हा उत्साह दिसून आला़ जिकडे-तिकडे शिवसैनिकांच्या घोषणा आणि नमो नमोचा गजर सुरू होता़ मतमोजणी केंद्रावर नेत्यांचे आगमन होताच त्यांचा सत्कार व जल्लोष करणार्‍या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसांडून वाहताना दिसून आला़ (वार्ताहर)