शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील घटनेनंतर शहरातील कोविड सेंटरला अग्निशमन यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मुंबईच्या भांडुप परिसरातील ड्रीम्स मॉलमधील रुग्णालयाला गुरुवारी मध्यरात्री आग लागल्यामुळे तब्बल ११ रुग्णांचा जळून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : मुंबईच्या भांडुप परिसरातील ड्रीम्स मॉलमधील रुग्णालयाला गुरुवारी मध्यरात्री आग लागल्यामुळे तब्बल ११ रुग्णांचा जळून मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेनंतर राज्यात पुन्हा एकदा कोविड रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील महापालिकेच्या सहा कोविड सेंटरला तातडीने फायर सिलिंडर प्रदान करण्यात आले. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी साधे सिलिंडरही उपलब्ध नाहीत.

शहरात ६००पेक्षा अधिक खासगी रुग्णालये आहेत. त्यातील ११० रुग्णालयांनी अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे तर ४९० खासगी रुग्णालयांनी आजपर्यंत महापालिकेच्या अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. एकीकडे खासगी रुग्णालयांची अनास्था दिसून येत असताना महापालिकेने सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्येही अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली नव्हती. मुंबईतील आगीच्या घटनेनंतर शुक्रवारी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला खडबडून जाग आली. त्यानंतर तातडीने शहरातील ६ कोविड सेंटरला आग विझवण्याचे छोटे सिलिंडर प्रदान करण्यात आले. उर्वरित कोविड सेंटरला दोन दिवसात फायर सिलिंडर आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील कोविड केअर सेंटरमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे किंवा नाही, याची शहानिशा महापालिकेच्या अग्निशमन विभागाने केली असता, अनेक ठिकाणी साधे सिलिंडरही नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाला अग्निशमन यंत्रणा उभारण्याचे पत्र महापालिकेकडून देण्यात आले आहे.

किलेअर्क कोविड सेंटरवर प्रशिक्षण

शुक्रवारी तातडीने महापालिकेच्या किलेअर्क येथील कोविड सेंटरला अग्निशमन विभागाने फायर सिलिंडर प्रदान केले. तेथील कर्मचाऱ्यांना आग लागल्यानंतर सिलिंडरचा वापर कशा पद्धतीने करावा, या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. आणीबाणीच्या परिस्थितीत अग्निशमन यंत्रणेला कसा संपर्क साधावा, यासंदर्भातही सविस्तर माहिती देण्यात आली. या सेंटरवर ३००पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.

मेल्ट्रोन हॉस्पिटल येथेही यंत्रणा

राज्य शासनाच्या मदतीने चिकलठाणा येथे कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र मेल्ट्रोन हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. मागील वर्षभरात याठिकाणी महापालिकेने अग्निशमनची यंत्रणा उभी केली नव्हती. शुक्रवारी तातडीने याठिकाणी फायर सिलिंडर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. लवकरच याठिकाणी कायमस्वरूपी यंत्रणाही बसविण्यात येणार आहे.

चार सेंटरवर केली व्यवस्था

रुग्णालय नसलेल्या इमारतींमध्ये महापालिकेने कोरोना रुग्णांसाठी तात्पुरत्या स्वरूपात कोविड सेंटर सुरू केली आहेत. सिपेट, पदमपुरा, संत तुकाराम वसतिगृह, देवगिरी बॉईज् होस्टेल येथे अग्निशमन यंत्रणा प्रदान करण्यात आली आहे. शहरातील उर्वरित सर्व सीसीसीवर अग्निशमन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. रुग्णांच्या सुरक्षेसाठी सर्व व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत.

मुंबईच्या घटनेनंतर त्वरित कारवाई

मुंबईत रुग्णालयाला आग लागल्यानंतर शुक्रवारी औरंगाबाद शहरातील महापालिकेच्या सहा केंद्रांना अग्निशमन यंत्रणा पुरविण्यात आली. ग्रामीण भागातील फायर ऑडिट सुरू करण्यात आले. शहरातील खासगी रुग्णालयांकडेही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. रुग्णांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक ठिकाणी फायर सिलिंडर उपलब्ध व्हावेत, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. फायर सिलिंडरची ‘एक्सपायरी डेट’ फार कमी दिवसांची असते. ज्याठिकाणी फायर सिलिंडर आहेत, त्यांची तपासणीसुद्धा करण्यात येत आहे.

आर. के. सुरे, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा.