शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन अधिकारी निलंबनातच निवृत्त

By admin | Updated: July 1, 2017 00:49 IST

औरंगाबाद : अतिक्रमण हटाव पथक, घनकचरा, अग्निशमन आदी विभागांचा ‘समर्थ’पणे कामकाज पाहणारे महापालिकेतील मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन अखेर शुक्रवारी निलंबन काळातच निवृत्त झाले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अतिक्रमण हटाव पथक, घनकचरा, अग्निशमन आदी विभागांचा ‘समर्थ’पणे कामकाज पाहणारे महापालिकेतील मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन अखेर शुक्रवारी निलंबन काळातच निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी रुजू होण्यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शुक्रवारी महापालिकेतील आणखी २१ कर्मचारी निवृत्त झाले. मागील वर्षी दिवाळीत जि. प. मैदानावर फटाक्यांच्या दुकानांना आग लागल्यानंतर तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी झनझन यांना निलंबित केले होते. त्यापूर्वी त्यांनी आपले वय कमी असून, पाच वर्षे आणखी वाढवून द्यावेत म्हणूनही खंडपीठापर्यंत धाव घेतली होती. मागील एक वर्षापासून ते परत मनपा सेवेत रुजू होण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत होते. मागील आठ दिवसांपासून झनझन यांनी मनपा प्रशासनावर बराच दबाव वाढविला होता. आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी त्यांना रुजू करून घेण्यास नकार दर्शविला. अखेर निलंबन काळातच झनझन यांना निवृत्ती स्वीकारावी लागली. सायंकाळी साडेपाच वाजता अग्निशमन विभागात झनझन यांना निरोप देण्यात आला. यावेळी नगररचना विभागाचे संचालक ए. बी. देशमुख, कर मूल्यनिर्धारण अधिकारी वसंत निकम यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.निवृत्त होणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रमोद खोब्रागडे, ए. ओ. पवार, यामीन अली खान, अलका राजवैद्य, मंगला श्रीकांत (निलंबित), विश्वनाथ चौधरी, प्रकाश जोशी, मोहंमद एकबाल, रावसाहेब दांडगे, धनसिंग बकले, दादाराव तायडे, लक्ष्मण कांबळे, शिवाजी देवकाते, तान्हाजी ढोके, सुधाकर ढकळे, उत्तम खरात, रतन फुले, अनंता वाघमारे आदींचा समावेश आहे.