शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

‘रेकॉर्ड रूम’ ला आगीची झळ

By admin | Updated: October 31, 2016 00:48 IST

औरंगाबाद : शनिवारी फटाका बाजार आगीमध्ये बेचिराख झाला. या आगीची तीव्रता एवढी होती की जि. प. च्या संरक्षण भिंतीलगतचे विशाल वृक्षही यातून सुटले नाहीत.

औरंगाबाद : शनिवारी फटाका बाजार आगीमध्ये बेचिराख झाला. या आगीची तीव्रता एवढी होती की जि. प. च्या संरक्षण भिंतीलगतचे विशाल वृक्षही यातून सुटले नाहीत. आरोग्य विभागाला लागूनच १३७ क्रमांकासह फटाक्यांची अनेक दुकाने होती. बाजूलाच जिल्हा परिषदेचे महत्त्वाचे दस्तावेज असलेली ‘रेकॉर्ड रूम’ आहे. आगीची धग आणखी थोडा वेळ राहिली असती, तर ‘रेकॉर्ड रूम’ला आग लागून पाच- सहा दशकांपासून जतन करण्यात आलेली महत्त्वाची कागदपत्रेही या आगीत भस्मसात झाली असती. यासंदर्भात जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड सांगत होते की, सकाळी ११.३० वाजेची वेळ असावी. घाटीजवळ असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालपासून ते शासकीय वाहनात बसून जि. प. मुख्यालयाकडे निघाले. अंजली सिनेमागृहाजवळ त्यांचे वाहन आले त्यावेळी ते मोबाईलवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्याकडून प्रशिक्षणाबद्दलची माहिती जाणून घेत होते. त्यावेळी त्यांना फटाक्यांची आतषबाजी सुरू असल्यासारखा आवाज आला. मात्र, आवाज थांबेना. ते जि. प. मुख्यालयाजवळ पोहोचले तरी फटाक्यांचा आवाज सुरूच होता. त्यामुळे त्यांनी आपल्या चालकास त्याबद्दल विचारणा केली. तेव्हा चालकाने सांगितले की, साहेब जि. प. मैदानावर थाटण्यात आलेल्या फटाका बाजाराला आग लागली आहे. त्यांनी तात्काळ आरोग्य विभागामागे असलेल्या ‘रेकॉर्ड रूम’कडे अधिकाऱ्यांसोबत जाऊन पाहणी केली. बाजूला असलेल्या वृक्षाला आगीची झळ बसली होती. झाडाची मोठी फांदी पेटली होती. संरक्षण भिंतीला लागून असलेली फटाक्यांची सर्व दुकाने आगीच्या कवेत होती. सुदैवाने अग्निशामक दल व शहरातील टँकरचालकांनी अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ‘रेकॉर्ड रूम’ पर्यंत आगीची धग पोहोचली नाही.