हदगाव : पंचायत समितीच्या शिक्षण विभागात वीज नादुरुस्त झाल्याने काम सुरू होते. शॉटसर्कीट झाल्यामुळे सहा वर्षापासून जमा असलेल्या रद्दीला आग लागली. परंतु घटना कार्यालयीन वेळेत घडल्यामुळे आग लवकरच आटोक्यात आली.आज दुपारी १२ च्या सुमारास पंचायत समिती कार्यालयाच्या जुन्या इमारतीतील शिक्षण विभागाची वीज गुल झाली होती. वीज दुरुस्त करण्यासाठी विद्युत आॅपरेटरला बोलावण्यात आले. शॉटसर्कीट झाल्याने अनेक वर्षापासून संचित केलेल्या रद्दीजवळ विद्युत ठिणगी पडली. त्यामुळे अर्ध्या तासात कार्यालयात धूर घुमू लागला. ही घटना कळताच अग्नीशमन दलाची गाडी आली व त्यांनी १५ ते २० मिनिटात आग आटोक्यात आणली.ही घटना कार्यालयीन वेळेत घडल्याने मोठा अनर्थ टळला. संध्याकाळी ही घटना घडली असती तर सर्व कार्यालय आगेच्या लपेटात आले असते. या घटनेने अनेक अफवांचे पिक शहरात लगेच पसरल्याने बघ्याची मोठी गर्दी झाली होती. बी. आय. यरपुलवार (बीईओ) म्हणतात. बीडीओ व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झाले. ६ वर्षापासून साठवलेल्या रद्दीचे निविदा काढून विक्री करण्यात येईल. ज्यादा भावाने घेणाऱ्यांना ही रद्दी दिली जाईल. शिक्षण विभागाचे नुकसान झाले नाही. (वार्ताहर)
पं.स.च्या शिक्षण विभागाला आग
By admin | Updated: August 13, 2014 00:45 IST