शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
4
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
5
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
6
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
7
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
8
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
9
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
10
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
11
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
12
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
13
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
14
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
15
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
16
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
17
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
18
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
19
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
20
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!

अग्निशमनचा उपकर एमआयडीसीने घटविला

By admin | Updated: July 24, 2014 00:26 IST

नवीन नांदेड : येथील औद्योगिक क्षेत्रात ‘एमआयडीसी’ च्या वतीने लावण्यात आलेला फायरसेस अर्थात अग्निशमनचा उपकर कमी करण्यात आला आहे. उद्योजक मित्रमंडळाने यासाठी पुढाकार घेतला.

नवीन नांदेड : येथील औद्योगिक क्षेत्रात ‘एमआयडीसी’ च्या वतीने लावण्यात आलेला फायरसेस अर्थात अग्निशमनचा उपकर कमी करण्यात आला आहे. उद्योजक मित्रमंडळाने यासाठी पुढाकार घेतला.एमआयडीसीने औद्योगिक क्षेत्रात उभालेल्या फायर स्टेशनच्या खर्चाचा भार या भागातील उद्योजकांच्या भूखंडाला विभागून देण्यात आला. हा उपकर दोन रुपये ९५ पैसे प्रतिचौरस मीटर होता. हा दर जास्तीचा असल्याने उद्योजक मित्र- मंडळाने तो कमी करावा, यासाठी प्रयत्न सुरु केले. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गगरानी, मुख्य अग्निशमन अधिकारी एम. व्ही. देशमुख यांच्याकडे गेल्या सहा महिन्यांपासून उपरोल्लेखित उपकरासंदर्भात पाठपुरावा सुरू होता. या सर्व बाबींचा विचार करून महामंडळाने १७ जुलै २०१४ रोजी एक परिपत्रक काढून नांदेड येथील ‘फायरसेस’ कमी केले. या परिपत्रकानुसार आता प्रतिचौरस मीटर १ रूपये ७० पैसे इतका दर आकारण्यात आला आहे. आनंद बिडवई, अतुल बेरळीकर, गोविंद साबु, गिरीष मोगडपल्ली, महेश रेखावार, निलेश मुंदडा, आशिष लोखंडे व राकेश शहा, अशोक कासलीवाल, कबीर जस्सानी यांनी या निर्णयाचे स्वागत केले.(वार्ताहर)नवीन पूल - लातूर फाटापर्यंतचे दिवे बंदनवीन नांदेड : नवीन पूल - लातूर फाटा रस्त्यावरील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावर मोठी रहदारी आहे. रात्रीला या रस्त्यावर अंधार पसरलेला असतो. या भागातील नागरिकांना अंधारातच घरी परतावे लागते. अंधारामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे फावत आहे. वाटमारीच्या अनेक घटना या रस्त्यावर घडल्या आहेत. रस्त्यावरील पथदिवे सुरु करण्याची मागणी मनसेचे सुनील पाटील, महेश राठोड, बालाजी चव्हाण, नागेश पांचाळ, सतनामसिंग, अमोल नलावडे यांनी केली.(वार्ताहर)उद्योजक मित्रमंडळाचे अध्यक्ष आनंद बिडवई व उपाध्यक्ष अतुल बेरळीकर आणि उद्योजक ललित तापडीया यांनी स्थानिक औद्योगिक वातावरण व परिस्थितीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान, नांदेडचा ‘फायर सेस’ हा औरंगाबाद जवळील पंचतारांकित शेन्द्रा एमआयडीसी पेक्षा जास्त असल्याचे उद्योजकांच्या शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.