शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फटाका आग प्रकरणाचा अहवाल मंत्रालयात; पंचनामे ११ कोटींचे झाले मात्र नुकसानभरपाई कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 17:37 IST

जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केटला आॅक्टोबर २०१६ मध्ये आग लागल्यामुळे ११ कोटींच्या आसपास नुकसान झाल्याचा पंचनामा अहवाल महसूल प्रशासनाने शासनाकडे पाठविला; परंतु त्यामध्ये अद्याप एक रुपयाची नुकसानभरपाईदेखील संबंधितांना मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

ठळक मुद्दे आॅक्टोबर २०१६ मध्ये जिल्हा परिषद मैदानावर लागलेल्या भयावह आगीत १४० फटाक्यांची दुकाने जळून राख झाली होती. यात एकूण १० कोटी ५८ लाख ३७ हजार ६७० रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला.

औरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केटला आॅक्टोबर २०१६ मध्ये आग लागल्यामुळे ११ कोटींच्या आसपास नुकसान झाल्याचा पंचनामा अहवाल महसूल प्रशासनाने शासनाकडे पाठविला; परंतु त्यामध्ये अद्याप एक रुपयाची नुकसानभरपाईदेखील संबंधितांना मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी तहसीलदार सतीश सोनी यांना याप्रकरणी पत्रकारांसमक्ष विचारले असता सोनी म्हणाले, ११ कोटींचे नुकसान झाल्याचे पंचनामे सादर केले आहेत. दरम्यान, त्या पंचनाम्यांना दोन वर्षे होत आली आहेत, अजून नुकसान झालेल्या संबंधितांना मदत मिळालेली नाही. आॅक्टोबर २०१६ मध्ये जिल्हा परिषद मैदानावर लागलेल्या भयावह आगीत १४० फटाक्यांची दुकाने जळून राख झाली होती. शेकडो वाहनेदेखील त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. त्याचे पंचनामे महसूल प्रशासनाने केले होते. जिल्हा परिषद मैदानावरील फटाका बाजारात २९ आॅक्टोबर २०१६ रोजी झालेल्या अग्नितांडवात फटाक्यांच्या १४० दुकानांसह ११२ वाहनेही जळाली. या वाहनांत चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा समावेश होता. यात एकूण १० कोटी ५८ लाख ३७ हजार ६७० रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला. मंडप व वाहने मिळून ११ कोटींपर्यंतचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले. ही मदत आजवर मिळालेली नाही.

या पंचनाम्यांचे असे होऊ नये आॅक्टोबर २०१६ मध्ये केलेले पंचनामे अजून शासनदरबारी धूळ खात पडले असतील तर, १२ मे २०१८ रोजी शहरातील राजाबाजार, नवाबपुरा, शहागंज, मोतीकारंजा, गुलमंडी, गांधीनगर या भागांत झालेल्या दंगलीत जे नुकसान झाले त्याच्या भरपाईच्या पंचनाम्यांचे काय होणार व संबंधितांना मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा दावा केला आहे. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद