शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नारेगावात भोंदूबाबाचा महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:04 IST

वेडसर पतीला भूतबाधा झाल्याचा बहाणा करून ते काढण्यासाठी भोंदू जाणत्याने जालना येथील एका महिलेवर चार दिवस अत्याचार केले. महिलेच्या तक्रारीवरून भोंदूबाबाला नारेगावातून जादूटोण्याच्या साहित्यासह जालना पोलिसांनी शनिवारी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वेडसर पतीला भूतबाधा झाल्याचा बहाणा करून ते काढण्यासाठी भोंदू जाणत्याने जालना येथील एका महिलेवर चार दिवस अत्याचार केले. महिलेच्या तक्रारीवरून भोंदूबाबाला नारेगावातून जादूटोण्याच्या साहित्यासह जालना पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.शेख रहीमद शेख अब्दुल (४०, रा़ घाटनांदूर, बीड, ह़ मु़ नारेगाव, औरंगाबाद) असे या जाणत्याचे नाव आहे़ पोलीस सूत्रांनी सांगितले की, पीडित महिला जालन्यातील रहिवासी आहे़ तिचा पती भोळसर आहे. अनेक ठिकाणी उपचार करूनही त्याचा काही उपयोग होत नव्हता. त्यामुळे पीडितेच्या सासूने जादूटोण्याचा इलाज करण्यासाठी शेख रहीमदला बोलावले होते. शेख रहीमदने या कुटुंबाला विश्वासात घेतले़ पतीच्या अंगातील भूत काढण्यासाठी एक दिवस घरात रिंगण मारून पूजा मांडली़ रिंगणात दोघा पती-पत्नीला बसविले़ एका रिंगणात ज्वलनशील पदार्थ टाकून त्यावर कपडा टाकला़ ज्वलनशील पदार्थामुळे कपड्याने पेट घेतला़ त्यानंतर भूतबाधा मोठी असल्याचा बहाणा त्याने केला़ हा प्रकार वर्षभर सुरू होता़ दरम्यानच्या काळात पतीचा इलाज करण्यासाठी भोंदू शेख रहीमद पीडितेला घराच्या गच्चीवर नेऊन अघोरी प्रयोग करायचा़दागिने, रोख रक्कमही लांबविलीपीडितेचे वशीकरण करून त्याने घरातील दागिने, पैसे, विमा पॉलिसी व अन्य सर्व बाबींची माहिती मिळविली़ भूत काढण्यासाठी घरातील दागिन्यांची पूजा करावी लागेल अन्यथा तुझ्या पतीचा मृत्यू होईल, असे एक दिवस त्याने पीडितेला सांगितले़ पूजा एकांतात करावी लागते, असा बहाणा करून पीडितेला दागिने घेऊन औरंगाबादमधील नारेगाव येथील घरी बोलावले़ पतीच्या आयुष्यासाठी पीडिता घरातील सर्व दागिने, रोख १ लाख ९० हजार रुपये घेऊन भोंदूबाबाकडे गेली़. भोंदू रहीमदने पीडितेला चार दिवस खोलीत डांबून पाण्यातून गुंगीचे औषध देऊन वारंवार अत्याचार केले़ हा प्रकार रहीमदच्या पत्नीच्या लक्षात आल्यानंतर ती घरातून निघून गेली़ चार दिवसांनंतर त्याने पीडितेला सिडको बसस्थानकावर नेऊन सोडले़ पीडिता नातेवाईकांशी संपर्क करून कशीबशी जालन्याला पोहोचली़सदर बाजार ठाण्यात जाऊन (दि.६ आॅगस्ट) सोमवारी भोंदूबाबा शेख रहीमदविरुद्ध अत्याचार व जादूटोणाविरोधी कायद्यानुसार फिर्याद दिली़ गुन्हा दाखल होताच सदर बाजार पोलिसांनी नारेगाव येथून शेख रहीमदच्या मुसक्या आवळल्या़ पीडितेसह तिची मुले, सासू यांचे ८४ हजार ५०० रुपयांचे दागिने व रोख ४१ हजार रुपये हस्तगत केले़ जादूटोण्यासाठी वापरलेले साहित्यही जप्त केले़ शेख रहीमदला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ उपनिरीक्षक रमेश रुपेकर आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली़