शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
2
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
3
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
4
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
5
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
6
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
7
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
8
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
9
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
10
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
11
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
12
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
13
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
14
शिराळ्यात नाईक विरुद्ध नाईक चुलत भावांमध्ये लढत! केदार नलवडे रिंगणात; तिरंगी सामन्यात कोण मारणार बाजी ?
15
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
16
नुसती ढकलाढकली, मेट्रो जोडणीमुळे घाटकोपर स्टेशन ठरले गर्दीचे 'हॉटस्पॉट'!
17
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
18
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
19
कमाल! नोकरीसोबतच घराचीही जबाबदारी, ६ वेळा नापास; २ मुलींची आई ४० व्या वर्षी झाली IAS
20
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठ्यात पीककर्ज मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:24 IST

चार हजार शेतकरी वंचित : व्यवस्थापकाविना बँक रामभरोसे

श्यामकुमार पुरेसिल्लोड : तालुक्यातील अजिंठा येथील स्टेट बँक आॅफ इंडियामधून एकाही शेतकऱ्याला अद्याप पीककर्ज न मिळाल्याने शेतकºयांवर सावकाराच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकºयांनी उसनवारी करुन पेरणी, खते, बि-बियाणे खरेदी केली.अजिंठा येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेला व्यवस्थापक नसल्याने येथील कामकाज रामभरोसे सुरू आहे. बºयाचदा नेटवर्क डाऊन असल्याने दोन -दोन दिवस बँकेचे काम बंद असते. गेल्या महिन्यापासून या शाखेला व्यवस्थापक नसल्याने एकाही शेतकºयाला या शाखेतून पीककर्ज मिळालेले नाही. कुणाला किती कर्जमाफी मिळाली याच्या याद्या अजूनही शेतकºयांना बघायला मिळाल्या नाहीत. बँकही याबाबत माहिती देत नाही. नवीन पीककर्ज मिळत नाही. यामुळे या बँकेवर अवलंबून असलेले तब्बल ४ हजार शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.याशिवाय तब्बल महिभरापासून एकही नवीन बचत खाते उघडण्यात आले नाही. यामुळे अनेक व्यापारी, शेतकºयांचे यामुळे दैनंदीन व्यवहार रखडले आहेत. शासनाने शेतकºयांना कर्जमाफीसाठी शेतकरी सन्मान योजनेअंर्तगत आॅनलाईन अर्ज भरावयास लावले. यासाठी शेतकºयांनी रात्रंदिवस रांगा लावून आॅनलाईन अर्ज केले, मात्र आजपर्यंत कर्जमाफीची यादी बँकेत न लावल्याने शेतकरी बँकेत चकरा मारत आहेत. ४ हजार शेतकºयांना कर्जमाफीबाबत कुणीही माहिती देण्यास तयार नसल्याने शेतकरी बँकेत चकरा मारुन मेटाकुटीस आले आहेत.कर्जमाफीचीही माहिती मिळेनाअजिंठा येथे एकच राष्ट्रीयीकृत एसबीआय बँक असून या शाखेअंतर्गत अजिंठा, मुखपाठ, पिंपळदरी, अनाड, दिग्रस, बाळापूर, बोदवड आदी गावे येतात. या परिसरातील शेतकरी याच बँकेवर अवलंबून आहेत. या शाखेत एकूण कर्जदार शेतकºयांची संख्या ४ हजार ४२ आहे. यापैकी केवळ २५ टक्के प्रोत्साहनपर लाभास केवळ १४ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांना २ लाख ४१ हजार ७५२ रुपये माफ झाले आहेत. तर १७१४ शेतकºयांना कमी -अधिक प्रमाणात कर्जमाफी मिळाली आहे. मात्र कुणाला किती माफी मिळाली, याच्या याद्या अजूनतरी शेतकºयांना बघायला मिळाल्या नाहीत. यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.काटे...बँक म्हणते...याद्यांमध्ये अनेक त्रुटीज्या शेतकºयांना प्रोत्साहनपर कर्जमाफी मिळाली ते लाभार्थी उर्वरित कर्जाची रक्कम बँकेत भरत नाही. उर्वरित रक्कम भरून खाते बेबाक होत नाही तोपर्यंत नवीन कर्ज देता येत नाही. माझे खाते पूर्ण बेबाक झाले पाहिजे, असे प्रत्येक शेतकºयास वाटत आहे. यामुळे कुणी पैसे भरण्यास तयार नाही. यात काही संभ्रमात असलेले शेतकरी बँकेत येत नाहीत. यामुळे बँक कर्मचाºयांना दोषी ठरविणे योग्य नाही. याला राज्य शासनसुद्धा तितकेच जबाबदार आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकºयांना आम्ही माहिती देतो. काही याद्या अजून आल्या नाहीत. याद्यांमध्ये अनेक त्रुटी आहेत.- अविनाश आंबेराव, लेखाधिकारी, एसबीआय, अजिंठा.मला अधिकार नाही...४ जून रोजी व्यवस्थापक विजय पोतू यांची बदली झाली. त्यांच्या जागी नवीन अधिकारी आले नाही. माझ्याकडे सध्या पदभार आहे. पण धोरणात्मक निर्णय, कर्जवाटप मी करू शकत नाही. फिल्ड आॅफिसर व व्यवस्थापक आल्यावर सर्व सुरळीत होईल, असे अविनाश आंबेराव यांनी सांगितले.जिल्हा बँकेतर्फे १ कोटीचे कर्जवाटपया तुलनेत अजिंठा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जमाफीच्या याद्या बँकेत लावल्या आहेत. थकबाकीदार २०७ शेतकºयांपैकी ९१ शेतकºयांना ३१ लाख १७ हजार, चालू बाकीदार ८०८ पैकी ४३१ शेतकºयांना ६७ लाख २७ हजारांची कर्जमाफी मिळाली आहे. अजिंठा, अनाड, मुखपाठ, बोदवड, पिंपळदरी येथील ४३३ नियमित कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांना १ कोटी ३१ लाख १ हजार ९२९ रुपये नवीन पीक कर्जवाटप करण्यात आले असल्याची माहिती या बँकेचे भाग चौकसनिस एस. एस. गोरे यांनी दिली.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरी