शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

‘डीएनए’ चाचणी अहवाल मिळेना

By admin | Updated: June 17, 2014 00:40 IST

कुरूंदा : स्थानिक पोलिसांनी कुरूंद्यातील सांगडा प्रकरणातील एका बेपत्ता युवकासह महिलेच्या नातेवाईकांचे रक्तनमुने ओळख पटविण्यासाठी डीएनए

कुरूंदा : स्थानिक पोलिसांनी कुरूंद्यातील सांगडा प्रकरणातील एका बेपत्ता युवकासह महिलेच्या नातेवाईकांचे रक्तनमुने ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणीकरिता मुंबईच्या कलीना प्रयोगशाळेत पाठविले होते. जवळपास दोन वर्षाचा कालावधी उलटला तरी त्याचा अहवाल न आल्याने पोलिसांपुढील अडचणी वाढल्या आहेत. कुरूंदा येथील जि. प. हायस्कुल जवळ एका कोरड्या टाकीत दोन मानवी सांगडे आढळले होते. त्यापैकी एक सांगडा युवकाचा तर एक युवतीचा होता. दरम्यान, कुरूंद्यातील एक युवक बेपत्ता असल्याने त्याचाच हा सांगाडा असल्याचा दाट संशय त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केला होता. तसेच गावातील एक महिलाही बेपत्ता आहे. या दोघांच्या नातेवाईकांचे रक्तनमुने डीएनएसाठी पोलिसांनी दोन वर्षापूर्वी पाठविले होते. ‘डीएनए’मुळे ओळख पटल्यास तपासणीला दिशा मिळण्याची शक्यता आहे. दोन वर्ष उलटले तरी अद्याप त्या डीएनएचा अहवाल मुंबई प्रयोगशाळेतून कुरूंदा पोलिसांकडे आलेला नाही. प्रयोगशाळेतून डीएनए न आल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गरीब कुटुुंबातील व्यक्तीचे हे प्रकरण असल्यामुळे संबंधित अधिकारी हलगर्जीपणा दाखवित असल्याचा आरोप होत आहे. संबंधित प्रयोगशाळा डीएनए देण्यासाठी हलगर्जीपणा का दाखवित आहे. त्याची तक्रार थेट मंत्रालयात पोलिस प्रशासनातर्फे करणे गरजेचे होते; परंतु पोलिस प्रशासन देखील शांत असल्याचे दिसते. डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तपास असताना हे प्रकरण निकाली न निघाल्याने तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका खासगी दूरचित्रवाहिनीच्या विशेष क्राईम रिपोर्ट कार्यक्रमात बेपत्ता युवकाच्या आईने त्याचा घातपात झाल्याचा थेट संशय व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे हे देखील त्यात दूरध्वनीवरून सहभागी होते. एकूणच सुरूवातीपासून पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतलेले नाही. वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांना विचारले असता, हे प्रकरण दोन वर्षापुर्वीचे असून काही दिवसांपुर्वीच ते माझ्याकडे आले आहे. त्याबाबत माहिती घेणे सुरू असून डीएनए रिपोर्ट आणण्यासाठी पोनि दर्जाचा अधिकारी मुंबईला ३ दिवसांपुर्वीच पाठवण्यात आला आहे. दरम्यान, कुरूंदा येथील बेपत्ता युवकाच्या आईसह साक्षीदारांचे पुन्हा जवाब नोंदवून या प्रकरणाचा फेरतपास करणार असल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)नव्याने तपासाची मागणीदोन वर्षापूर्वी वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील जि.प. हायस्कुल जवळ असलेल्या पाण्याच्या एका कोरड्या टाकीमध्ये दोन मानवी सांगाडे आढळले होते.एक सांगाडा युवक तर दुसरा युवतीचा होता. कुरूंद्यातील बेपत्ता युवकाचाच हा सांगाडा असल्याचा दाट संशय त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केला होता. त्याच काळात युवकाप्रमाणचे गावातील एक महिलाही बेपत्ता झाली होती. या दोघांच्या नातेवाईकांचे रक्त नमुने ‘डीएनए’ चाचणीसाठी कुरूंदा पोलिसांनी दोन वर्षापुर्वी पाठविले होते. दोन वर्ष उलटले तरी अद्याप त्या ‘डीएनए’ अहवाल मुंबई प्रयोगशाळेतून पोलिसांकडे आलेला नाही.गरीब कुटुंबातील युवकाचे हे प्रकरण असल्यामुळे संबंधित अधिकारी हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप होत आहे.एका खासगी दूरचित्रवाहिनीच्या विशेष क्राईम रिपोर्ट कार्यक्रमात बेपत्ता युवकाच्या आईने त्याचा घातपात झाल्याचा थेट संशय व्यक्त केला आहे.