अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या एम.बी.बी.एस.च्या शंभर जागांऐवजी त्या ५० कराव्यात अशी सूचना एमसीआयच्या वतीने प्राप्त झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र, वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने अटींची पूर्तता केली. त्यामुळे यावर्षीही एम.बी.बी.एस.ची प्रवेश क्षमता १०० एवढीच कायम राहणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एमसीआयच्या वतीने पाहणी करण्यात आली होती. या पाहणीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्या. तसेच मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली वैद्यकीय शिक्षकांची पदे, बंद असलेला सोनोग्राफी विभाग अशा विविध अपूर्तततेमुळे एमसीआयच्या वतीने शंभर ऐवजी प्रवेशाच्या ५० जागा रद्द का करू नयेत. अशी नोटीस वैद्यकीय महाविद्यालयाला तीन महिन्यांपूर्वी बजावली होती. या प्रकारामुळे अंबाजोगाई शहरात प्रचंड खळबळ उडाली. ग्रामीण भागातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी मेडीकल कॉलेज बचाव कृतीसमिती व विविध संघटनांनी एमसीआयच्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली. मुख्यमंत्री ते स्थानिक आमदार यांच्यामार्फत पाठपुरावा करून सर्व त्रुटी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला.
अखेर एमबीबीएसच्या १०० जागा कायम
By admin | Updated: May 26, 2017 00:26 IST