शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

...अखेर अपहृत युवक आई-वडिलांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:56 IST

शहरातील माऊली नगर येथील गणेश श्रीकृष्ण शिंदे या युवकाचे सहा जणांनी १९ आॅगस्ट रोजी रात्री ९.३०च्या सुमारास अपहरण केले होते. त्याचा उस्मानाबाद जिल्ह्यात शोध लागल्यानंतर आज त्याला पालकांच्या स्वाधीन केले. यातील पाच आरोपी पकडले व एक आरोपी मात्र फरार झाला असून लवकर त्यास ताब्यात घेण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी २२ आॅगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कबासंबा/हिंगोली : शहरातील माऊली नगर येथील गणेश श्रीकृष्ण शिंदे या युवकाचे सहा जणांनी १९ आॅगस्ट रोजी रात्री ९.३०च्या सुमारास अपहरण केले होते. त्याचा उस्मानाबाद जिल्ह्यात शोध लागल्यानंतर आज त्याला पालकांच्या स्वाधीन केले. यातील पाच आरोपी पकडले व एक आरोपी मात्र फरार झाला असून लवकर त्यास ताब्यात घेण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी २२ आॅगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.गणेश हा एटीएममधून पैसे काढण्यासाठी हिंगोली शहरात आला व त्याचे सहा जणांनी अपहरण केले. गणेशच्याच मोबाईलवरून त्याच्या वडिलांना संपर्क साधून दोन लाख न दिल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. अपहरणकर्त्यांनी त्याला कारच्या डिकीत डांबून ते विविध जिल्ह्यात फिरत होते. उस्मानाबाद जिल्ह्यात ढाबाचालकाशी वाद झाला अन् आरोपी पकडले गेले. ढाबचालकाने गणेशची डिकीतून सुटका करून गणेशच्या घरच्यांशी संपर्क साधून मुलगा सुखरुप असल्याचे सांगितले. नंतर गणेशला वाशी पोलीसांच्या स्वाधीन केले. आरोपी ऋषिकेश महादेव कोकने वय १८ रा. पारगाव, रोहित हनुमंत राक्षे वय २२ रा. लक्ष्मीनगर, मोशी, रामेश्वर अप्पसाहेब थवर वय २१ रा. आळंदी, ता. खेड, गजानन अंकुश शिंदे वय १८ रा. सरस्तेवती, ता. हवेली, जि. पुणे यांना अटक केली आहे. यातील अंकुश त्रिभुवन हा आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. त्याचा शोध सुरू आहे.आईचा उपवास सुटलागणेश १९ तारखेपासून अपहरणकर्त्यांच्या ताब्यात असल्याने त्याची आई राधाबाई व वडील श्रीकृष्ण यांच्या जीवात जीव नव्हता. त्यांनी अन्नच सोडले होते. तो मंगळवारी सायंकाळी साडेपाचला घरी आला अन् त्याला बिलगून त्या रडल्या. त्याला पेढा भरविला. गल्लीतील मंडळीही जमली. आईची ही अवस्था बघून इतरांचेही डोळ्यात आश्रू आले होते. त्याला विचारपूस केली जात होती. अनुभवलेला थरार सांगताना त्याचेही डोळे पाणावले होते. शिंदे यांना किरण डहाळे, अमित रटनालू, अ‍ॅड. राजू गोटे, गरड, रवी जैस्वाल यांनी मदत केली.