शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर क्रांतीचौकातील पुतळ्याची उंची वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 13:43 IST

क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामाचे भूमिपूजन टिकाव मारून महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामाचे भूमिपूजन टिकाव मारून महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता केले. या उद्घाटनानंतर शिवप्रेमींनी ढोल, ताशांचा गजर करून या शुभवार्ताचे स्वागत केले.क्रांतीचौकात उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या वेळीच मनपात पुतळ्याची उंची वाढविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र मागील ५ वर्षांपासून या ठरावाची अंमलबजावणी झाली नव्हती. यावेळी औरंगाबाद सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे महापौर, मनपा आयुक्तांची भेट घेऊन शिवजयंतीच्या मुहूर्तावर पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य न केल्यास समितीतर्फे सायंकाळी भूमिपूजन करण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी भूमीपूजन करण्यात आले. या कामासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करून ठरावाच्या अंमलबजावणीची सूचनाही दिल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी टिकाव मारून भूमिपूजन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुभाष झांबड, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपमहापौर विजय औताडे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पाटील, माजी आमदार कल्याण काळे, संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, स्थायी समितीचे अध्यक्ष गजानन बारवाल, विकास जैन, राजेंद्र जंजाळ, त्रिंबक तुपे, अभिजित देशमुख आदींसह हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.

टॅग्स :Rajendra Dardaराजेंद्र दर्डाkranti chowkक्रांती चौक