शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर शैक्षणिक वेळापत्रक झाले जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:39 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक कॅलेंडर अखेर तयार झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक कॅलेंडर अखेर तयार झाले आहे. पदव्युत्तर प्रवेशाच्या गोंधळामुळे शैक्षणिक वर्ष मध्यात आल्यानंतर कॅलेंडर बदलावे लागले आहे. यात दिवसांची काटछाट करून १८० दिवसांचा कार्यक्रम तयार केल्याचे स्पष्ट झाले.विद्यापीठाने २४ एप्रिल रोजी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाच्या कॅलेंडरला मान्यता दिली होती. हेसुद्धा एक वेळा बदलण्यात आलेले होते. या दुसºयांदा तयार केलेल्या कॅलेंडरमध्ये तिसºयांदा सुधारणा करण्यात आली आहे. ही सुधारणा पदव्युत्तर प्रवेशाच्या गोंधळामुळे करावी लागली. विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या नेतृत्वाखालील समितीने नवीन कॅलेंडर बनविले आहे. या कॅलेंडरनुसार पहिले सत्र नियोजित वेळेनुसार एक महिना ७ दिवस पुढे गेले आहे. यामुळे विद्यापीठाला दिवाळी सुट्या कमी कराव्या लागल्या आहेत. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार दिवाळीच्या सुट्ट्या १६ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर यादरम्यान होत्या. यामध्ये आता बदल होऊन दिवाळीच्या सुट्ट्या १४ ते २८ आॅक्टोबर एवढ्या केल्या आहेत. तर १६ डिसेंबर ते ४ जानेवारी २०१८ दरम्यान प्रथम सत्राच्या परीक्षा होणार आहेत. पहिले सत्र १० जुलै ते ७ जानेवारीदरम्यान असणार आहे. यानंतर दुसºया सत्राला ९ जानेवारी रोजी सुरुवात होईल. ते सत्र ५ मे रोजी संपेल. हे वेळापत्रक तयार करताना समिती सदस्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागली आहे. परीक्षांना केवळ आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला. परीक्षा संपल्यानंतर दुसºया दिवसांपासून केवळ तीनच दिवस निकाल जाहीर करण्यासाठी दिले आहेत. दुसºया सत्रातही उत्तरपत्रिका तपासण्यासाठी केवळ तीनच दिवस देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.