शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीवरील अत्याचाराचे मोबाईलवर केले चित्रीकरण, नातेवाईक तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 19:03 IST

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराचे मोबाईलवर चित्रीकरण करून ब्लॅकमेल करणा-या तरूणाविरूद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे पीडिता १६ वर्षाची असताना आरोपीने पहिल्यांदा तिला धमकावून तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसापूर्वी त्याने तिच्यासोबतच्या अत्याचाराचे चित्रीकरण केले, यानंतर हे चित्रीकरण करून दाखवून तो तिला धमकावू लागला.

औरंगाबाद: २०११ पासून कालपर्यंत नातेवाईक तरूणानेच ती अल्पवयीन असल्यापासून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. एवढेच नव्हे तर या अत्याचाराचे मोबाईलवर चित्रीकरण करून तिला ब्लॅकमेल  करणा-या तरूणाविरूद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे आरोपी तरूण हा परभणी येथे एका शासकीय कार्यालयात कार्यरत असल्याचे समोर आले.

सॅम्युअल शशिकांत तारू (२६,रा. परभणी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा २०११मध्ये औरंगाबादेत शिकायला होता. पीडिता ही त्याची नातेवाईक आहे. पीडिता १६ वर्षाची असताना आरोपीने पहिल्यांदा तिला धमकावून तिच्यावर अत्याचार केला. तेव्हापासून तो तिच्यावर वारंवार अत्याचार करू लागला. काही दिवसापूर्वी त्याने तिच्यासोबतच्या अत्याचाराचे चित्रीकरण केले.

यानंतर हे चित्रीकरण करून दाखवून तो तिला धमकावू लागला. पीडितेने त्यास पोलिसांत जाण्याची धमकी दिल्यानंतर त्याने तिला लग्नाचे वचन दिले. मात्र, लग्न करण्यास तो टाळाटाळ करू लागला. दरम्यान, त्याला परभणी येथे शासकीय नोकरी लागली.नोकरी लागल्यापासून त्याने तिच्याशी संपर्क तोडला. आरोपीने लग्नाच्या प्रलोभनाने लैगिक शोषण केल्यामुळे ती आणि तिचे नातेवाईक संतप्त झाले. यानंतर तिने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार छावणी पोलिसांनी आरोपी सॅम्युअलविरूद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक खंडागळे पुढील तपास करीत आहेत.