एपीआय एन. ई. केळे व कॉन्स्टेबल प्रवीण सुरडकर यांना वैजापूर ते येवला रस्त्यावर एक व्यक्ती विदेशी दारु विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे त्यांनी येवला रस्त्यावर झगडा फाटा येथे सापळा रचला. दुपारी चार वाजेच्या सुमारास एक व्यक्ती खताच्या गोणपाटात काही तरी घेऊन येत असल्याचे आढळले. पोलिसांना संशय आल्याने त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलिसांनी झडती घेतली असता गोणपाटामध्ये सहा हजार रुपये किंमतीच्या ४० विदेशी दारुच्या बाटल्या आढळल्या. याप्रकरणी सुरडकर यांच्या फिर्यादीवरुन भागीनाथ त्रिभुवन याच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गवळी करीत आहेत.
विदेशी दारुची बेकायदा विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
By | Updated: December 2, 2020 04:10 IST