शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

पन्नास वर्षांची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:04 IST

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलिसांच्या दुटप्पीपणामुळे शहरात गणरायाचे मंगळवारीऐवजी बुधवारी विसर्जन करावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलिसांच्या दुटप्पीपणामुळे शहरात गणरायाचे मंगळवारीऐवजी बुधवारी विसर्जन करावे लागले. मागच्या ५० वर्षांत प्रथमच असे झाले.एका मंडळास डीजे वाजविण्याची परवानगी देण्यात आली; पण दुसºया मंडळाला नाकारल्याने झालेल्या पोलीस व मंडळ पदाधिकाºयांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे मंगळवारी श्रींचे विसर्जन न होता बुधवारी तणावपूर्ण वातावरणात मिरवणूक पार पडली. या घटनेमुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.जाफराबाद येथे सर्व धर्मांच्या उत्सवांमध्ये कोणतीच अडचण येणार नाही यासाठी पदाधिकारी आणि पोलीस प्रशासनाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. मात्र, यंदा मंडळाच्या पदाधिकºयांनी विनंती करूनसुद्धा पोलीस प्रशासनाने ऐकून न घेता मंडळाच्या पदाधिकाºयांनाच आरेरावीची भाषा वापरत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली.पोलीस निरीक्षक नंदकुमार पाटील यांनी शांतता समितीची बैठक न बोलवता पदाधिकाºयांच्या समस्या समजून न घेता सोयीनुसार कारभार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो फोल ठरला. एका मंडळास डीजे वाजविण्याची परवानगी तर दुसºयास परवानगी नाकारल्याचे पाहून गणेश भक्त आणि मंडळाचे पदाधिकाºयांत तीव्र नाराजी दिसून आली. मिरवणूक सुरू असताना परत वेळेच्या आत पूर्ण करा असा पोलिसांचा ससेमिरा सुरूच होता. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी मिरवणूक आपल्या पद्धतीने काढली. रात्रभर शिवाजी चौकात मिरवणूक थांबवून दुसºया दिवशी ही मिरवणूक सकाळी दहा वाजता पुढे सरकली. त्यामुळे ही मिरवणूक ऐतिहासिक ठरली आहे. त्यापूर्वी रात्री विभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे, तहसीलदार जे. डी. वळवी यांनी नगराध्यक्ष सऊद शेख, उपनगराध्यक्ष दीपक वाकडे, नगरसेवक वसीम जहागीरदार, रविराज जैस्वाल, अहेमद शेख, सुभाष वाकडे, सुरेश वाकडे, राजू वाकडे, कौसर शेख, मंडळाचे पदाधिकारी मयूर वाकडे, विशाल वाकडे, कैलास दिवटे, सुनील वाकडे, सोमेश लहाने, योगेश वाकडे व ग्रामस्थ यांच्यात चर्चा झाली. पोलीस अधिकाºयाची बदली करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.