शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव डम्परने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:21 IST

वाहतूक सिग्नल ग्रीन होताच सुसाट निघालेल्या डांबराच्या डम्पर ट्रकने मोपेडस्वार निवृत्त नायब तहसीलदाराला चिरडले. हा भीषण अपघात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हर्सूल टी पॉइंट चौकात झाला. या अपघाताचे भयावह चित्र पाहताना अनेकांचा थरकाप उडाला. मधुकर पंडितराव कुलकर्णी (६०, रा. भगतसिंगनगर) असे मृताचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वाहतूक सिग्नल ग्रीन होताच सुसाट निघालेल्या डांबराच्या डम्पर ट्रकने मोपेडस्वार निवृत्त नायब तहसीलदाराला चिरडले. हा भीषण अपघात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हर्सूल टी पॉइंट चौकात झाला. या अपघाताचे भयावह चित्र पाहताना अनेकांचा थरकाप उडाला.मधुकर पंडितराव कुलकर्णी (६०, रा. भगतसिंगनगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, मधुकर कुलकर्णी हे दोन वर्षांपूर्वी शासकीय सेवेतून निवृत्त झालेले आहेत. ते गुरुवारी दुपारी गावी जाणाºया नातेवाईकांना सोडण्यासाठी हर्सूल टी पॉइंट येथे आले. नातेवाईकांना बसमध्ये बसून दिल्यानंतर ते मोपेडवर (क्रमांक एमएच-२० बीआर ४३६०) बसून मयूर पार्ककडे रस्ता ओलांडून जात होते. यावेळी सिडको बसस्थानकाकडून हर्सूल गावाच्या दिशेने सुसाट निघालेल्या हायवा डम्परने (क्रमांक एमएच-२० एटी ४९३) त्यांना चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रकचे समोरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. त्यामुळे त्यांचा मेंदू बाहेर पडला आणि ते घटनास्थळीच ठार झाले. ट्रकखाली रक्ताचे थारोळे आणि मेंदू पडलेला पाहून प्रत्यक्षदर्शींच्या अंगाचा थरकाप उडत होता.अपघात घडताच चालक ट्रक सोडून घटनास्थळावरून पसार झाला. यावेळी तेथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी घटनेची माहिती हर्सूल आणि सिटीचौक पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक हेमंत कदम आणि हर्सूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रक्त आणि मांसावर माती टाकली.