शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

खते, बियाणे पडून

By admin | Updated: August 13, 2015 00:26 IST

राजेश खराडे ,बीड पावसाच्या लहरीपणाचा फटका केवळ शेतकरी वर्गालाच नाही तर खत, बि-बीयाणे विक्रेत्यांनाही बसला आहे. यंदा मागणीएवढा बी-बियाणांचा पुरवठा झाला होता.

राजेश खराडे ,बीडपावसाच्या लहरीपणाचा फटका केवळ शेतकरी वर्गालाच नाही तर खत, बि-बीयाणे विक्रेत्यांनाही बसला आहे. यंदा मागणीएवढा बी-बियाणांचा पुरवठा झाला होता. पावसाअभावी पेरण्या निम्म्यावरच ठप्प झाल्याने सुमारे ७२६३ क्विंटल बियाणे गोदामातच पडून आहे. पावसाने ओढ दिल्याने दुबारचीही आशा संपुष्टात आली आहे. त्यामुळे विके्रत्यांना लाखोंचा फटका बसला आहे. यंदा पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन या मुख्य पिकांच्या पेऱ्यावर भर दिला होता. त्यामुळे कापसाच्या पाकिटांची सर्रास विक्री झाली होती. मात्र, सोयाबीनच्या घरच्या बियाणावरच भर दिल्याने विक्रत्यांकडे सुमारे ५२१७ क्विंटल बियाणे शिल्लक राहिले आहे. प्रशासनाकडून महाबीजचे २२ हजार ५८९ चे बियाणे पुरविण्यात आले असल्याचे जि. प. चे कृषी विकास अधिकारी डी. बी. बिटके यांनी सांगितले. खाजगी तत्वावर २२ हजार ४८५ क्विंटलच्या बियाणांची पूर्तता करण्यात आली होती. वाढती मागणी पाहता कृषि विभागाने व व्यापाऱ्यांनी अधिकच्या बियाणांची खरेदी केली होती. मात्र, १५ जुलैपासून पावसाने ओढ दिल्याने बाजारपेठेतील शेतकऱ्यांची गर्दी ओसरली. परिणामी पेरणीत घट होत गेली. जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मात्र येथेही पावसाने दगाबाजी केल्याने दुबार पेरण्या तर सोडाच, आहे त्या पिकांची मोडणी करण्याचे संकट ओढावले होते. शहरातील प्रमुख बी-बियाणे वितरकांनी उधारीवर बी-बियाणे विक्रीसाठी दिले होते. सध्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीच बिकट असल्याने खरेदी झालेल्या बियाणांची वसुली होत नाही. शिवाय निम्म्यापेक्षा अधिकचे बियाणे गोदामात पडून असल्याने व्यापारीही शेतकऱ्यांप्रमाणे दुहेरी संकटात सापडलेले आहेत. शिल्लक बियाणांचा स्टॉक संबंधित कंपनीकडे पाठविण्यात येत असला तरी त्याचे पैसे रोख स्वरुपात मिळत नसून पुढील वर्षाच्या बियाणांसाठी पैसे राखून ठेवले जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारपेठेतील पत टिकवून ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना जवळचा पैसा तर गुंतवून ठेवावा लागत आहे, शिवाय बॅकांकडून घेतलेल्या रकमेवरचे व्याज भरणा देखील करावा लागत आहे. खरिपातील खोळंबलेल्या पेरणीचा फटका शेतकऱ्यांसोबतच बियाणे विक्रेत्यांनाही अप्रत्यक्षरित्या बसला आहे. खरीप ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद, सोयबीन आदींचे बियाणे तर कापसाचे पाकीटे मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत.जिल्ह्यातील लहान-मोठ्या विक्रेत्यांना उधारीवर खत, बि-बीयाणे देण्यात आले हाते. हंगामाच्या सुरवातीला बाजारपेठेत शेतकऱ्यांचा मोठा उत्साह होता. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांकडे विक्रेत्याचे व विक्रेत्यांकडे आमचे पैसे आडकले आहेत. शिल्लक बियाणे कंपनीकडे पाठवूनही त्वरीत पैसे मिळण्याची आशा धुसर आहे. - जगदीश मंत्री, विक्रेतेकापूस पाकिटांची बऱ्यापैकी विक्री झाली आहे. मात्र, यंदा शेतकऱ्यांनी घरच्या सोयाबीन बियाणावर भर दिल्याने ते अधिक प्रमाणात शिल्लक आहे. खतेही पडून आहेत. वेळोवेळी संबंधित कंपनीशी बियाणे व खते परतविण्यासाठी संपर्क सुरू आहे. अद्यापपर्यंच्या व्यवसायिकतेमध्ये सर्वाधिक फटका यंदाच्या हंगामात बसला आहे.- शीतल बागमार, विक्रेते