लातूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कर्जमुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या निलंबित १९ आमदारांचा सत्कार लातुरात केला जाणार आहे़ शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी शासन अनुकूल नाही़ शेतीमालाच्या भावात घसरण झाली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी म्हणून आमदारांनी विधानसभेत व परिसरात संघर्ष केला़ त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले़ याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निलंबित आमदारांचा सत्कार लातुरात केला जाणार आहे़ विधानसभा व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेत्यांना कार्यक्रमाला निमंत्रित केले जाणार असल्याचे राजेंद्र मोरे, अरूण कुलकर्णी, सत्तार पटेल, धर्मराज पाटील यांनी सांगितले़
स्वाभिमानीतर्फे ‘त्या’ निलंबित आमदारांचा सत्कार
By admin | Updated: March 24, 2017 00:21 IST