शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगमुक्ती देणाऱ्या डॉक्टरांचा रुग्णाच्या कुटुंबियांकडून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:35 IST

कर्करोग म्हटले की, अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मात्र, वेळीच उपचार घेतल्यास त्याला रोखणे शक्य आहे. अशाच प्रकारे मुखकर्करोगाची शस्त्रक्रिया यशस्वी करून कर्करोगमुक्त झालेले भूमी अभिलेख कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक रवींद्र कांबळे यांच्या कुटुंबियांनी गुरुवारी शासकीय कर्करोग रुग्णालयातील (राज्य कर्करोग संस्था) डॉक्टरांचा सत्कार करून आगळीवेगळी कृतज्ञता व्यक्त केली.

ठळक मुद्देकृतज्ञता : मुखकर्करोगाची शस्त्रक्रिया केली यशस्वी

औरंगाबाद : कर्करोग म्हटले की, अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मात्र, वेळीच उपचार घेतल्यास त्याला रोखणे शक्य आहे. अशाच प्रकारे मुखकर्करोगाची शस्त्रक्रिया यशस्वी करून कर्करोगमुक्त झालेले भूमी अभिलेख कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक रवींद्र कांबळे यांच्या कुटुंबियांनी गुरुवारी शासकीय कर्करोग रुग्णालयातील (राज्य कर्करोग संस्था) डॉक्टरांचा सत्कार करून आगळीवेगळी कृतज्ञता व्यक्त केली.शासकीय कर्करोग रुग्णालयातील सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे-कागीनाळकर, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. भारत सोनवणे, डॉ. गजानन सुरवाडे, डॉ. अर्चना राठोड, डॉ. सुरेखा बणे, डॉ. दीपक बोकनकर, डॉ. आलापुरे, डॉ. सोनल चौधरी, रतनकुमार पंडागळे, रामेश्वर लांडगे, संदीप भंडागे, बालाजी देशमुख, वर्षा कांबळे, दिगंबर पोळ आदींची उपस्थिती होती. यावेळी रवींद्र कांबळे यांचे संपूर्ण कुटुंबीय, नातेवाईक-मित्र परिवार उपस्थित होते. कांबळे यांच्यावर एप्रिल महिन्यात मुखकर्करोगाची शस्त्रक्रिया पार पाडली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने रुग्णालयातील डॉ. अजय बोराळकर यांचा कांबळे कुटुंबियांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी रुग्णालयाला व्हिल चेअरचीही भेट देण्यात आली. डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. वर्षा रोटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. प्रताप कोचुरे यांनी सूत्रसंचालन केले.रुग्णालयाची विश्वासार्हताशासकीय सेवेत असल्याने खाजगी रुग्णालयात कर्करोगाचे उपचार घेणे शक्य होते; परंतु शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या विश्वासार्हतेमुळे, प्रत्येकाने दिलेला धीर आणि डॉक्टरांनी यशस्वी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे कर्करोग दूर झाल्याची भावना रवींद्र कांबळे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :cancerकर्करोगAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल