शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

वर्ग-२ च्या जमिनीबाबत शासनाकडून मागविणार अभिप्राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:35 IST

तीन महिन्यांपासून २२५ पैकी ११८ प्रकरणे शासनाकडे पाठविले असून, या प्रकरणात पुढे काय निर्णय घ्यायचा यासाठी शासनाकडून अभिप्राय मागविण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

औरंगाबाद : जिल्ह्यात कूळ व इनामी जमिनींच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे डिसेंबर २०१७ मध्ये उघडकीस आले. तीन महिन्यांपासून २२५ पैकी ११८ प्रकरणे शासनाकडे पाठविले असून, या प्रकरणात पुढे काय निर्णय घ्यायचा यासाठी शासनाकडून अभिप्राय मागविण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

शासन दरबारी हे प्रकरण अडगळीला पडले असून, या प्रकरणांशी निगडित उपजिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई मात्र झालेली आहे. तीन महिन्यांपूर्वी या प्रकरणात विभागीय प्रशासनाने शासनाकडे अहवाल पाठविला आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांना निलंबनाला सामोरे जावे लागले; परंतु या जमिनीच्या व्यवहारांना स्थगिती देण्यासाठी शासनाने काहीही कारवाई केलेली नाही. 

महसूल सचिवांकडे सदरील प्रकरणाची माहिती देऊन तीन महिन्यांचा काळ लोटला आहे. अद्याप त्यावर निर्णय न झाल्यामुळे चौकशी समितीने घेतलेली मेहनत वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी बोलताना आयुक्त म्हणाले, शासन स्तरावर संचिकेबाबत काही ना काही निर्णय होत असतो. सध्या त्याबाबत शासनाने काहीतरी विचार केला असेल. शासन या प्रकरणात गप्प नसेल. प्रकरण कुठल्यातरी पातळीपर्यंत पोहोचलेले असते.

त्यामुळे नेमका काय निर्णय घ्यायचा  याबाबत अजून वरिष्ठ स्तरावरूनही काही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाकडून अभिप्राय मागविण्यात आला आहे. १०० एकरांहून अधिक जमिनी लाटण्याचा व्यवहार या प्रकरणात झाल्याची चर्चा १८ डिसेंबर २०१७ पासून सुरू आहे. शासनाचा २२ लाख रुपयांचा महसूलही बुडाला आहे. तो कधी वसूल करणार यावर विभागीय आयुक्त म्हणाले, शासन अभिप्रायानंतरच सर्व काही स्पष्ट होईल. 

टॅग्स :commissionerआयुक्तDistrict Collector Aurangabadजिल्हाधिकारी औरंगाबादState Governmentराज्य सरकार