शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरात होर्डिंग, मोबाईल टॉवर, कमानी कोसळण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 22:50 IST

शहरातील प्रमुख रस्ते, गर्दीच्या ठिकाणी महापालिकेने मोठमोठे लोखंडी होर्डिंग, कमानी उभारल्या आहेत. या होर्डिंगपोटी महापालिकेला कमी आणि खाजगी एजन्सींना मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. शुक्रवारी पुण्यात लोखंडी होर्डिंग रस्त्यावर कोसळून चार निष्पाप नागरिकांचा जीव गेला. या घटनेनंतर औरंगाबाद महापालिकेने सर्व होर्डिंगच्या तपासणीची घोषणा शुक्रवारी केली. शनिवारी एकाही होर्डिंगची तपासणी केली नाही. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने शहरातील विविध होर्डिंगची पाहणी केली असता अनेक होर्डिंग धोकादायक असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्दे महापालिका बिनधास्त : मालमत्ता विभागाकडून साधी तपासणीही नाही

औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्ते, गर्दीच्या ठिकाणी महापालिकेने मोठमोठे लोखंडी होर्डिंग, कमानी उभारल्या आहेत. या होर्डिंगपोटी महापालिकेला कमी आणि खाजगी एजन्सींना मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. शुक्रवारी पुण्यात लोखंडी होर्डिंग रस्त्यावर कोसळून चार निष्पाप नागरिकांचा जीव गेला. या घटनेनंतर औरंगाबाद महापालिकेने सर्व होर्डिंगच्या तपासणीची घोषणा शुक्रवारी केली. शनिवारी एकाही होर्डिंगची तपासणी केली नाही. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने शहरातील विविध होर्डिंगची पाहणी केली असता अनेक होर्डिंग धोकादायक असल्याचे दिसून आले.शहरात महापालिकेने ४६० पेक्षा अधिक मोठमोठे लोखंडी होर्डिंग उभारले आहेत. काही वर्षांसाठी सर्व होर्डिंग खाजगी एजन्सी चालकांना देण्यात आले आहेत. मागील अनेक वर्षांमध्ये या होर्डिंगची तपासणीच करण्यात आलेली नाही. पुण्याच्या घटनेनंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी शहरातील सर्व होर्डिंगची तपासणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. या आदेशाचे रूपांतर कृतीत अजिबात झाले नाही. उलट प्रशासनाने ही जबाबदारी खाजगी एजन्सी चालकांवर ढकलून दिली. त्यांनीच प्रत्येक होर्डिंगचे स्ट्रक्चरल आॅडिट करून आणून महापालिकेला द्यावे. उद्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर होर्डिंगचा लोखंडी ढाचा, स्वागत कमानी दुर्दैवाने कोसळल्या, तर त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर प्रशासनाकडे नाही.धोका डोक्यावर तरी...महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून लोखंडी होर्डिंग उभारले आहेत. ज्या दिवशी महापालिकेने हे काम केले तेव्हापासून आजपर्यंत होर्डिंगच्या लोखंडी रॉड कुठे गंजून खराब झालेत का? हे पाहण्याची तसदी घेतली नाही. सेव्हन हिल येथे सर्वाधिक होर्डिंग आहेत. पावसाच्या पाण्याने यातील काही होर्डिंगचे रॉड गंजले तरी प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. औरंगपुऱ्यातील लोखंडी स्वागत कमान एकाच बाजूने उभी आहे. ती सुद्धा वजनाने एका बाजूने वाकली आहे. दुसºया बाजूची कमान मोडकळीस आल्याने काढून टाकण्यात आली. या कमानीखाली २४ तास वैकुंठधामापर्यंत पोहोचवणारा स्वर्गरथ उभा असतो. अशीच अवस्था निराला बाजार, सिल्लेखान्यात पाहायला मिळाली. रेल्वे प्रशासनानेही स्वागत कमान उभारली आहे. या लोखंडी कमानीची अवस्था पाहण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे अजिबात वेळ नाही. जालना रोडवरील अमरप्रीत सिग्नलवरही लोखंडी कमानीची अवस्था वाईटच आहे.मोबाईल टॉवरही धोकादायकशहरात ३०० पेक्षा अधिक अनधिकृत मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. इमारतींची क्षमता नसतानाही लाखो टन वजनाचे मोठमोठे टॉवर उभारण्यात आले आहेत. वादळ-वारा आल्यावर हे टॉवर इमारतीसह कोसळतात की काय? अशी भीती निर्माण होत आहे. कोणत्या इमारतीवर मोबाईल टॉवर बसविणे शक्य आहे, याचा अहवाल महापालिकाच देऊ शकते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात