शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

रक्तबंबाळ स्थितीत वडिलांनी केला मुलासह इतरांचा बचाव

By admin | Updated: April 27, 2017 20:52 IST

घाटी रुग्णालयात जळीत रुग्णांच्या वॉर्डात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचे अचानक मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने दुसऱ्या रुग्णावर हल्ला

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 27 -  घाटी रुग्णालयात जळीत रुग्णांच्या वॉर्डात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचे अचानक मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने दुसऱ्या रुग्णावर हल्ला चढविला, परंतु त्या रुग्णाच्या वडिलांनी मुलाच्या बचावासाठी तात्काळ धाव घेत मानसनिक संतुलन बिघडलेल्या रुग्णाचा हल्ला थोपविण्याचा प्रयत्न केला. परंतु नियंत्रणाबाहेर असलेल्या या रुग्णाच्या जोरदार ठोशाने दात पडल्याने वडील रक्तबंबाळ झाले. जखमी अवस्थेतही या रुग्णाकडून इतरांवर हल्ला होऊ नये, म्हणून वडिलांनी त्याच्याशी एकप्रकारे झुंज देत त्याला ओढत वॉर्डाबाहेर काढल्याची घटना गुरुवारी(दि.२७)घडली.कांतीलाल शेटे(५८, रा. कसाबखेडा)असे या हल्लात जखमी झालेल्या व्यक्तीचे आणि मुलाचा बचाव करणाऱ्या वडिलांचे नाव आहे. त्यांचा मुलगा प्रशांत शेटे (३०) यांनी २३ एप्रिल रोजी तणाखाली जाळून घेतले होते. उपचारासाठी घाटी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २२ व २३ येथील ह्यआयसीयूह्णमध्ये दाखल करण्यात आले. ते ८० टक्के जळालेले असून त्यांच्या समोरच्या खाटेवरच ३० टक्के जळालेल्या हरिश पवार(४०, रा.भोकरदन, जि. जालना) यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास प्रशांत शेटे यांच्याजवळ कांतीलाल शेटे हे बसलेले होते. याच वेळी हरिश पवार अचानक प्रशांत शेटे यांच्यावर धावून गेला. अचानक झालेल्या हल्ल्यात मुलाला वाचविण्यासाठी कांतीलाल शेटे यांनी हरिश पवार यास रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु तो ह्यमी मारणारच, सोडणार नाहीह्ण असे म्हणत जोरदार हल्ला चढवित होता. प्रतिकार करताना अचानक हरिश पवारने मारलेल्या जोरदारर बुक्कीने कांतीलाल शेटे यांचे दोन दात पडले आणि त्यांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. कांतीलाल शेटे यांनी मदतीसाठी ह्यवाचवा वाचवाह्ण म्हणून हाक दिली. परंतु या घटनेने भयभित झालेल्या वॉर्डातील परिचारिकांनी, कर्मचाऱ्यांनी वॉर्डातील इतर खोल्यांचे दरवाजे लावून घेतले. तर काही कर्मचाऱ्यांनी वॉर्डाबाहेर पळ काढला. हरिश पवार अधिक आक्रमक होत असल्याचे लक्षात आल्याने इतरांवर हल्ल्याचा धोका होता. त्यामुळे कांतीलाल शेटे यांनी झटापट करून आणि ओढून त्याला वॉर्डाबाहेर ढकलेले आणि दरवाजा लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच सुरक्षारक्षकांनी तात्काळ धाव घेतली आणि त्याच्यावर नियंत्रण मिळविले. त्यामुळे इतर वॉर्डांमध्ये हल्ल्याचा प्रकार टळला. या घटनेमुळे २२ व २३ वॉर्डात गोंधळाचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाले होते. कांतीलाल शेटे यांच्यावर घाटीत उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनीही घाटीत धाव घेतली.