शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांचे तहसीलसमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 00:55 IST

कळंब : तालुक्यातील मोहा येथील मोहा तो कोकाटे वस्ती या रस्त्याचे मातीकाम लोकसहभागातून सुरू करण्यात आले होते. परंतु, सदरील कामास काही शेतकऱ्यांकडून विरोध झाल्याने ते बंद पडले.

कळंब : तालुक्यातील मोहा येथील मोहा तो कोकाटे वस्ती या रस्त्याचे मातीकाम लोकसहभागातून सुरू करण्यात आले होते. परंतु, सदरील कामास काही शेतकऱ्यांकडून विरोध झाल्याने ते बंद पडले. सदरील काम सुरू करण्यात यावे, या प्रमुख म्हणून शुक्रवारी मोहा येथील ग्रामस्थांनी शाळकरी मुले, महिलांसह तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केल आहे.मोहा गावापासून अंदाजे सातशे मिटर अंतरावर कोकाटेवस्ती आहे. याठिकाणी काही कुटूंब वस्ती करुन राहतात. याच ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळाही आहे. गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने शेतकरी, शाळकरी मुलांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्ता तयार करावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती. परंतु, शासन पुढाकार घेत नसल्याने स्थानिकांनी पुढाकार घेवून लोकसहभागातून या रस्त्याचे मातीकाम सुरू केले होते. ६०० मिटर काम करण्यात येणार होते. परंतु ४०० मिटरच्या आसपास काम पूर्ण झाल्यानंतर सर्व्हे क्र. ७७, १०७१ मधील शेतकऱ्यांनी नकाशाप्रमाणे काम करावे, असे सांगून काम रोखले. त्यावर ग्रामस्थांनी या प्रकरणी तहसील कार्यालयाकडे तक्रार करून खुणा करुन देवून रस्ता कामाचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार २० जुलै रोजी मंडळ अधिकारी मोहा व भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांसमक्ष खुणा करुन देण्यात आल्या व काम सुरू करण्यात आले. परंतु अधिकारी गेल्यानंतर पुन्हा काही शेतकऱ्यांनी हे काम अडवले. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी या प्रकरणी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करीत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार मोहा ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळपासून कळंब तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आंदोलनात माजी जि.प. सदस्य संदीप मडके, सोमनाथ मडके, मारूती कोकाटे, नवनाथ कोकाटे, तुळशीराम कोकाटे, लक्ष्मन कोकाटे, मनिषा कोकाटे, विमल कसबे, सरस्वती कोकाटे यांच्यासह स्थानिक नागरिक महिला, शाळकरी मुलेही सहभागी झाले आहेत. (वार्ताहर)