आंदोलन : विविध पक्ष, संघटनांचा पाठींबानळदुर्ग : शहरातील सर्व्हे नं. २९ मधील बेघर झालेल्या कुटुंबियांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन डुकरे यांनी ३ ते पासून नगर परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सदरील आंदोलनास विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दिला आहे. नळदुर्ग नगरपालिकेने डिसेंबरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. दरम्यान, रहदारीला अडथळा ठरेल असे ‘डीपी’ रोड व फुटपाथवरील अतिक्रमण काढण्यासंबंधी शासकीय पत्रकाचे सभागृहात वाचन झाल्यानंतर त्यात सर्व नगरसेवकांनी मंजुरी दिली होती. असे असतानाही पालिका प्रशासनाने सर्व्हे नं. २९ मधील पन्नास वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची घरे ‘जेसीबी’द्वारे जमीनदोस्त केली. हा एक प्रकारे सर्वसंबंधितांवर अन्यास असल्याचे सांगत संबंधित कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी नगरसेवक सचिन डुकरे यांनी मंगळवारपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज पहिला दिवस आहे. सदरील उपोषणास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष ज्योतिबा येडगे, सचिव प्रमोद कुलकर्णी, भोई समाज क्राती दलाचे जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे, मनसे परिवहन उपाध्यक्ष बशीर शेख, हरिबा कांबळे, महिला काँग्रेस जिल्हा संघटक कल्पना गायकवाड, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय दास्कर, सुधीर हजारे, नगरसेवक निरंजन राठोड, दयानंद बनसोडे, काँग्रेस युवक शहराध्यक्ष बसवराज धरणे, भाजपा शहराध्यक्ष पद्माकर घोडके, भाजयुमो चे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, व्यापारी गफुर इनामदार, राजेंद्र खद्दे, मोहन धरणे, सामाजिक कार्यकर्ता विनायक अहंकारी, मारूती खारवे, सोशिलिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे बळीराम जेठे, युवा सेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, शिवाजी नाईक, उत्तम बनसगोळे, रिपाइं शहराध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, रिपाइं अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष बाशीद कुरेशी, एमआयएमच्या फातिमा कुरेशी यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी नगराध्यक्ष मुनवर सुलताना कुरेशी, शब्बीर सावकार, शहबाज काझी, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. इशारा : अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करणारनगर परिषदेकडून डिसेंबर राबविण्यात आली होती अतिक्रमण हटावे मोहीम.मोहिमेदरम्यान पन्ना वर्षांपासून वास्तव्यास असणारे बेघर झाल्याचा आरोप.
बेघर कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी उपोषण
By admin | Updated: May 4, 2016 00:30 IST