शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

..तर शेतकरी सरकारला वाऱ्यावर सोडतील

By admin | Updated: June 18, 2017 00:42 IST

बीड :वापसा उडून गेला तर सरकारचे काही खरे नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायकर्ता मेळाव्यात दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सरसकट कर्जमाफीबद्दल भाजप- शिवसेनेने टाळाटाळ केली, शेतकरी वाऱ्यावर सोडला तर शेतकरी सरकारला वाऱ्यावर सोडतील, वापसा उडून गेला तर सरकारचे काही खरे नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायकर्ता मेळाव्यात दिला. अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी ही भूमिका राष्ट्रवादीने घेतली. शेतकरी विरोधी भूमिका सरकारने घेतली. परंतु, शेतकऱ्यांनी संप पुकारल्यानंतर सरकारला जाग आली. कर्जमाफीबद्दल वेगवेगळे निकष लावून शब्दच्छल केला तर राष्ट्रवादी कॉँग्रेस पुन्हा सरकारच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम करील, असा इशारा पवार यांनी दिला. खरिपाचा हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांना बियाणे- खते खरेदी करायची आहे. परंतु, कर्जमाफीची दहा हजारांची मदत देताना निकष का लावले जात आहेत, असा सवाल पवार यांनी केला.शेतकऱ्याच्या मुलाने उदरनिर्वाहासाठी लहान व्यवसाय सुरु केला असेल किंवा शेतीकामासाठी चारचाकी वाहन घेतले असेल तर त्याची चूक काय? सातवा वेतन आयोग देताना आमचा विरोध नाही परंतु, कर्जमाफीत शेतकऱ्यांसाठी जाचक अटी का असा सवाल करुन मोठे शेतकरी बाजूला ठेवा, लहान वाहने वापरणारा, लहान व्यवसाय करणारा, ज्याला मदतीची गरज आहे त्याला अडवू नका. वेळेवर दहा हजारांची मदत करा, असे पवार या वेळी म्हणाले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, राष्ट्रवादीने १८ वर्ष पूर्ण केली, १९ व्या वर्षात वाटचाल करताना हे वर्ष बळीराजाला समर्पित केले, राज्य सरकारने कर्जमाफी सुखासुखी दिली नाही. सरकारने कर्जमाफीबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेसने आग्रही भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत तर आमदारांनी विधानसभेत केली. वेळ पडल्यास हाती रुमणं घेण्याची भूमिका राष्ट्रवादीने मांडली असे तटकरे म्हणाले. संयोजक संदीप क्षीरसागर यांनी प्रास्ताविक भाषण केले.