शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्येचा तपास आता पोलीस उपनिरीक्षकांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:57 IST

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला तात्काळ शासकीय मदत मिळावी यासाठी शेतकरी आत्महत्येच्या कारणांचा तपास आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने पोलीस प्रशासनास दिल्या आहेत

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला तात्काळ शासकीय मदत मिळावी यासाठी शेतकरी आत्महत्येच्या कारणांचा तपास आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने पोलीस प्रशासनास दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे शेतकरी आत्महत्येचा तपास पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांकडे असणार आहे.मागील काही वर्षांमध्ये नापिकी व कर्जबाजारीपणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. कायम दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. जालना जिल्ह्यात २०१६ मध्ये ७६ तर २०१७ मध्ये आॅगस्टअखेर ४४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील अनेक शेतकरी आत्महत्येचा तपास न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल न मिळणे व अन्य कारणांमुळे अपूर्ण आहे. परिणामी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत मिळालेली नाही. दरम्यान, शेतकरी आत्महत्येच्या घटनेनंतर अनेकदा तपास कामाला विलंब होतो.विष प्राशन केल्याच्या घटनांमध्ये सहा महिने उलटूनही न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळेचा अहवाल मिळत नाही. शिवाय तपास कामातही विलंब झाल्याने अनेक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब शासकीय मदतीपासून वंचित राहतात. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतकºयांच्या प्रश्नांबाबत राज्याच्या कै.वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनअंतर्गत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकºयांना शासनाकडून तात्काळ नुकसान भरपार्ई देण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या होत्या. त्यानुसार गृह विभागाने आदेश पारित केले आहेत. शेतकरी आत्महत्येच्या घटनेननंतर संबंधित ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना द्याव्या, न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळेने दोन दिवसांमध्ये अहवाल सादर करावा, शेतकरी आत्महत्या प्रकरणाच्या तपासाची सर्व कार्यवाही एका आठवड्यात पूर्ण करण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.