लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कपाशीवरील बोंडअळीग्रस्त शेतक-यांच्या खात्यात मदत जमा करण्याच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणेला दोन महिने झाले. मदत शेतक-यांंच्या खात्यात त्वरित जमा करावी, या मागणीसाठी कृषी विभाग कार्यालयासमोर शेतकºयांनी बुधवारी दुपारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. क्रांतीचौक पोलिसांनी तत्परता दाखवून अंगावर रॉकेल ओतून घेतलेल्या शेतकºयांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी याप्रकरणी ३७ शेतक-यांवर दंगलीसह अन्य गुन्हे दाखल केले आहेत.क्रांतीचौकातील विभागीय सहसंचालक कार्यालयासमोर गंगापूर तालुक्यातून माजी सभापती संतोष जाधव (वजनापूरकर) यांच्यासह अनेक कार्यकर्ते आले. त्यांनी गळ्यात कपाशीच्या कैºयांच्या माळा घातल्या होत्या. बोंडअळीचे पंचनामे, क्रॉसपंचनामे होऊनही कृषी खाते जबाबदारी विमा कंपन्यांवर ढकलत आहे.दुसरीकडे शासन कागदोपत्रीच घोडे नाचवीत आहे, याचा निषेध करून संतोष पाटील जाधव यांनी लपवून आणलेली रॉकेलची बॉटली अंगावर ओतण्यास सुरुवात केली. पोलीस पथकाने त्वरित त्यांच्या हातातून बाटली हिसकावली. शेतकºयांनी ‘बोंडअळीग्रस्त शेतकºयांंच्या बँक खात्यात अनुदान त्वरित जमा करा’ अशी घोषणाबाजी सुरू केली. या वेळेत चार ते पाच शेतकºयांंनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सर्व शेतकºयांना ताब्यात घेत १० ते १५ मिनिटे चाललेल्या नाट्यावर पोलिसांनी पडदा टाकला. आंदोलनातील ३७ शेतकºयांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडीत कोंबले. यावेळी आंदोलनात बबन डुबे (संभाजी सेना), महेश गुजर (शेकाप), युवराज ताठे, भावराव लोहकरे, सुभाष जगताप, काकासाहेब डुबे, अण्णासाहेब जाधव (मनसे तालुकाध्यक्ष), ज्ञानेश्वर तिवाडे, राजू तिखे, संजय चव्हाण, पंडित खेडकर, अप्पासाहेब जगदाळे आदी शेतकºयांची उपस्थिती होती. क्रांतीचौक ठाण्यात दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत.आंदोलनाचे पत्र दिले ७ रोजीतक-यांनी आंदोलनाचे पत्र ७ फेब्रुवारीला कृषी विभागाला दिले होते. आठवडा होऊनही कारवाई न झाल्याने शेतकºयांंनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो हाणून पाडत त्यांना ताब्यात घेतले. राज्यात ३४ लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकांवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले. परिणामी, १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड केलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे.आंदोलनास पाठिंबाआत्मदहन आंदोलनाला मराठा मावळा संघटनेने पाठिंबा दिला आहे. दरम्यान मदत तात्काळ न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकºयांंनी दिला.
औरंगाबादेत शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:51 IST
कपाशीवरील बोंडअळीग्रस्त शेतक-यांच्या खात्यात मदत जमा करण्याच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणेला दोन महिने झाले. मदत शेतक-यांंच्या खात्यात त्वरित जमा करावी, या मागणीसाठी कृषी विभाग कार्यालयासमोर शेतकºयांनी बुधवारी दुपारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. क्रांतीचौक पोलिसांनी तत्परता दाखवून अंगावर रॉकेल ओतून घेतलेल्या शेतकºयांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
औरंगाबादेत शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
ठळक मुद्देक्रांतीचौकात उडाला थरार : ३७ शेतक-यांवर दंगलीचे गुन्हे दाखल